घरट्रेंडिंग'या' व्यक्तीने उघडले तांदळाचे ATM; लॉकडाऊनपासून १२ हजार लोकांना झाला फायदा!

‘या’ व्यक्तीने उघडले तांदळाचे ATM; लॉकडाऊनपासून १२ हजार लोकांना झाला फायदा!

Subscribe

एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याने सुरू केलेल्या तांदळाच्या एटीएममुळे लोकांना खूप फायदा झाला आहे. २५ मार्च रोजी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात १२ हजार लोकांना याचा फायदा झाला आहे. तांदळाचे एटीएम तयार करणारा एमबीए पदवीधर असलेला व्यक्ती आहे. तो म्हणाला की, ‘ज्याला पुढच्या जेवणासाठी तांदूळ नसले त्याने पाच दिवस पुरेल एवढे धान्य एटीएममधून घ्यावे.’ यामुळे या एटीएममधून तांदूळ घेण्यासाठी रांगाच रांग लागली.

तांदळाचे एटीएम तयार करणाऱ्या व्यक्तीचे नाव रामू दोसपती असे आहे. दोसपतीच्या तांदळ्याच्या एटीएमचा अधिकाधिक लोकं फायदा घेत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तांदळाचे एटीएम हैदराबाद येथील एलबी नगरमध्ये आहे. कोरोनाच्या काळात नोकरी गमावलेल्या आणि कमी वेतन मिळणाऱ्या गरीब लोकांसाठी दोसपतीने पुढाकार घेतला.

- Advertisement -

कुणी भुकेला झोपू नये म्हणून दोसपतीने हा उपक्रम सुरू केला. या एटीएममधून कोणीही येऊन तांदूळ घेऊन शकते. बुधवारी १०० हून अधिक जणांनी याचा लाभ घेतला आहे. एवढेच नाही तर दोसपतीने स्वतः अनेक कोरोना रुग्णांचा कुटुंबियांना तांदूळ दिले आहेत.

अपघातामुळे दोसपतीला मिळाली प्रेरणा

२००६ मध्ये जेव्हा दोसपतीचा अपघात झाला तेव्हा त्याच्या डोक्याला दुखापत झाली. त्यावेळेस त्याने देवाकडे प्रार्थना आणि वचन दिले की, जर नवीन आयुष्य दिले तर लोकांची सेवा करीन.

- Advertisement -

मग पुन्हा दोसपतीसोबत दुसरा अपघात झाला. तो म्हणजे माणूसकीचा. जेवणाची सोय नसलेल्या एक चौकीदारचे कुटुंब परप्रांतीय कामगारांच्या कुटुंबासाठी चिकन घेण्यासाठी दोन हजार रुपये खर्च करताना त्याने पाहिले. या अपघातामुळे दोसपतीला सेवा करण्याची प्रेरणा मिळाली.

तांदूळ खरेदीसाठी दोसापतीने त्याच्या भविष्य निर्वाह निधीतून तीन लाख रुपये काढून एकूण चार लाख रुपये खर्च केले. गरिबांसाठी काम करणाऱ्या इतर काही लोकांनीही त्याचे समर्थन केले.

इंग्रजी विषयाचा लेक्चरर असलेल्या माणसाने एटीएममधून तांदूळ घेतले. त्या व्यक्तीने सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपासून त्याला पगार मिळालेला नाही. त्याला तांदळाचा एटीएम कळाले. त्यामुळे तो आपल्या कुटूंबासाठी तांदूळ आणण्यासाठी येथे येतो.


हेही वाचा – ग्राहकांसाठी सुवर्णसंधी: सोन्याची किंमत ५० हजारांच्या खाली!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -