घरट्रेंडिंगकिटाणू नष्ट करणाऱ्या कंपन्यांचा दावा किती खरा किती खोटा?

किटाणू नष्ट करणाऱ्या कंपन्यांचा दावा किती खरा किती खोटा?

Subscribe

एखादे उत्पादन एका विषाणूवर ९९.९ टक्के प्रभावी असू शकतो मात्र ते दुसऱ्या विषाणूवर प्रभावी ठरेल असे नाही.

SARS,H1N1 आणि आता आलेला COVID-19 विषाणू. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक किटाणूंमुळे अनेक व्हायरल आणि फ्लू समोर आले. त्या व्हायरसने अनेक नव्या उत्पादनांना जन्म दिला. ही उत्पादके आम्ही सूक्ष्म विषाणूंना मुळापासून नष्ट करतो असा दावा करतात.  सॅनिटायझर, हॅडवॉश, फर्श आणि टॉयलेट क्लिनर सारख्या घरगुती गोष्टींसाठी वापरण्यात येणारी स्वच्छता उत्पादनांच्या कंपन्या आम्ही ९९.९ टक्के किटाणू आणि बुरशी नष्ट करतो असा दावा करतात. आजवर अनेक जाहिरातीमध्ये आपण हे पाहिले किंवा वाचले असले.

अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, एखादे उत्पादक ९९.९ टक्के किटाणू नष्ट करतो ही प्रशंवसनीय बाब नाही. एखादे उत्पादन एका विषाणूवर ९९.९ टक्के प्रभावी असू शकतो मात्र ते दुसऱ्या विषाणूवर प्रभावी ठरेल असे नाही. ९९.९ टक्के किटाणू नष्ट करणाच्या दावा करणारी लोकप्रिय उत्पादने किटाणू आणि रोगांच्या केवळ छोट्या स्पेक्ट्रमवर प्रभवी ठरु शकतात.

- Advertisement -

सर्व किटाणूनाशकात तरल पदार्थ समान तयार केले जात नाहीत. असे म्हटले जाते की, किटाणूनाशक एकमेकांपेक्षा अनेक प्रकारे वेगळे असू शकतात. त्यांच्यात भिन्न कार्यक्षमता आणि भिन्न गुणोत्तर देखील असू शकतात.

अशाप्रकारचे कोणतेही उत्पादन घेताना निर्जतुंकिकरण करण्यासाठी आवश्यक असलेले घटक ओळखा. डोमेक्स सरफेस आणि फ्लोर डिसइंपेक्टे सारख्या ब्रँडमध्ये सक्रिय तत्त्वाच्या रुपात सोडिअम हाइपोक्लोराइट असते. हे उपलब्ध असलेल्या सर्व शक्तिशाली किटाणूनाशकांपैकी एक आहे. तसेच किटाणू, व्हायरस,बुरशी सारख्या किटाणूंमध्ये व्यापक स्पेक्ट्रमवर काम करते. विविध वैज्ञानिक साहित्यांच्या अभ्यासातून सोडिअम हाइपोक्लोराइट जलद गतीने काम करते.

- Advertisement -

या उत्पादनांपासून सावध रहा

दहा पैकी आठ उत्पादक जे आपले प्रोडक्ट एक रिफ्रेश आणि निर्जतुकिकरण म्हणून विकण्याचा प्रयत्न करतात. अनेक प्रोडक्ट एकत्र करुन ते तयार केले जातात. ज्यामुळे उत्पादनाचा प्रभाव कमी करुन मूलभूत तत्त्वांवर लक्ष केंद्रीत केले जाते.

 


हेही वाचा – लस घेऊनही वाढतोय कोरोनाच्या ‘ब्रेकथ्रू इंफोक्शन’चा धोका, प्रभावी लसीचा शोध सुरु

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -