Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग Indian Air Force मध्ये नोकरीची संधी; १० वी ते पदवीधर उमेदवारांना करता...

Indian Air Force मध्ये नोकरीची संधी; १० वी ते पदवीधर उमेदवारांना करता येणार अर्ज

Related Story

- Advertisement -

भारतीय हवाई दलात ग्रुप सीच्या अनेक नागरी पदांकरता भरती होणार आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्यांपासून ते पदवीधर झालेल्या उमेदवारांना भारतीय हवाई दलात नोकरीची संधी उपलब्ध झाली असून यासाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. कोणती पदे भरली जातील, अर्ज कसा करावा, निवड कशी करण्यात येईल याची माहिती सविस्तर…

ही भरती हवाई दलाच्या दक्षिण पश्चिम हवाई कमांड मुख्यालयांतर्गत केल्या जाणार आहे. भारतीय हवाई दलात मल्टी-टास्किंग स्टाफ, हाउस कीपिंग स्टाफ, मेस स्टाफ, एलडीसी, क्लर्क हिन्दी टाईपिस्ट, स्टेनोग्राफर ग्रेड-२, स्टोर सुपरीटेंडेंट, लॉन्ड्रीमॅन, आया / वार्ड सहायिका, कुक, फायरमॅन आणि स्टोर कीपर अशा २५५ पदांकरता उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

- Advertisement -

या पदांसाठी अर्ज करताना शैक्षणिक पात्रता वेगळ्या आहेत. काही पदांसाठी किमान पात्रता दहावी पास तर काही बारावीसाठी तर काही पदांसाठी पदवीपर्यंतचे शिक्षण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे किमान वयोमर्यादा १८ आणि जास्तीत जास्त २५ वर्षे आहे. ओबीसी प्रवर्गास जास्तीत जास्त वयोमर्यादा ३ वर्षे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी ५ वर्षे, अपंगांसाठी १० वर्षे सवलत मिळेल. विभागीय कर्मचारी, विधवा, घटस्फोटित किंवा न्यायालयीन विभक्त महिलांनाही वयात सवलत मिळणार आहे.

असा करता येणार अर्ज

भारतीय हवाई दलाच्या या रिक्त जागांसाठी तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना अधिसूचनेसह देण्यात आला आहे. त्याची प्रिंट काढून त्यातील सर्व माहिती भरावी लागेल. संपूर्णपणे भरलेला अर्ज लिफाफ्यात ठेवून अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. लिफाफ्यावर १० रूपयांचं पोस्टल स्टँप लावून कोणत्या पदासाठी अर्ज करता आहात ते नमूद करणे गरजेचे आहे. आपला अर्ज १३ मार्च २०२१ पर्यंत दिलेल्या पत्त्यावर पाठवणं आवश्यक आहे.

- Advertisement -

IAF Group C recruitment notification and application form साठी येथे क्लिक करा

- Advertisement -