Eco friendly bappa Competition
घर ट्रेंडिंग IAS Tina Dabi Marriage : IAS ऑफिसर टीना दाबी पुन्हा होणार विवाहबद्ध,...

IAS Tina Dabi Marriage : IAS ऑफिसर टीना दाबी पुन्हा होणार विवाहबद्ध, कोण आहे तिचा दुसरा पती?

Subscribe

टीना दाबी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सोशल मीडियावर टीनाही तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

यूपीएसी परीक्षेतील टॉपर आयएएस टीना दाबी पुन्हा एकदा विवाहबद्ध होणार आहे. 2016 च्या राजस्थान कॅडर अधिकारी टीना दाबी ही 2013 बॅचचे आयएएस (IAS) प्रदीप गावंडे यांच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. 22 एप्रिल रोजी जयपूरमधील एका हॉटेलमध्ये त्यांचा संपूर्ण विवाह सोहळा पार पडणार आहे. टीनाने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रदीप गावंडेसोबतचे फोटो शेअर करत नव्या आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.

टीना दाबीने तिचा भावी पती प्रदीप गावंडेसोबतचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुम्ही देत असलेले स्मित मी घातलं आहे.’ टीनासोबत प्रदीप गावंडे यांनीही त्यांच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रदीप गावंडे टीनासोबत हात जोडताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tina Dabi (@dabi_tina)

- Advertisement -

कोण आहे टीना दाबीचा दुसरा पती?

दरम्यान चुरूचे जिल्हाधिकारी असलेले प्रदीप गावंडे यांचेही हे दुसरे लग्न आहे. आयएएस होण्यापूर्वी ते डॉक्टर होते. तर टीना दाबीनेही याआधी 2018 मध्ये IAS अतहर खानशी लग्न केले होते. टीना दाबी आणि अतहर खान प्रशिक्षणादरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. 2016 च्या यूपीएससी परीक्षेत अतहर खान हे दुसरे टॉपर होते. 2018 मध्ये या दोघांच्या लग्नाने बरीच चर्चा झाली होती. लग्नानंतर अतहर खान राजस्थानमध्ये नोकरीलावर रुजू झाले, मात्र टीनापासून घटस्फोट घेतल्यानंतर ते जम्मू-काश्मीर कॅडरसोबत आपल्या राज्यात गेले.

- Advertisement -

टीना सोशल मीडियावर असते अधिक सक्रिय

टीना दाबी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सोशल मीडियावर टीनाही तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. टीना अनेकदा तिचे फोटो आणि शानदार रील शेअर करते जे खूप व्हायरल होते.

टीना दाबी ही मूळची दिल्लीची आहे. गेल्या वर्षी तिची बहीण रिया दाबी हिनेही पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास केली होती. रिया ही UPSC उत्तीर्ण करणाऱ्या सर्वात तरुण उमेदवारांपैकी एक ठरली आहे. तिने वयाच्या 23 व्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -