घरट्रेंडिंगकंपनीचा अजब कारभार: दिवसातून एकदाच जा टॉयलेटला, नाहीतर भरा दंड

कंपनीचा अजब कारभार: दिवसातून एकदाच जा टॉयलेटला, नाहीतर भरा दंड

Subscribe

प्रत्येक कंपनीत लंच ब्रेक असतो. तसेच काहीत कंपनी लंच ब्रेकसह टॉयलेट ब्रेकही दिला जातो. कोणतीच कंपनी यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना थांबवू शकत नाही. पण एका कंपनीने एक अजब पॉलिस कर्मचाऱ्यांकरिता तयार केली आहे. या अजब पॉलिसी अंतर्गत कर्मचारी दिवसातून एकदाच टॉयलेटला जाऊन शकतो. पण जर तो एकाहून अधिक वेळा टॉयलेट गेला तर त्याला दंड भरावा लागणार आहे. असा गजब नियम हुकुमशाही असलेल्या चीन देशातील कंपनीने काढला आहे.

एकापेक्षा जास्त वेळा टॉयलेट गेल्यावर भरावा लागणार इतका दंड

चीनच्या अनपू इलेक्ट्रिक सायन्स अँड टेक्नोलॉजी कंपनीने ही हुकूमशाही वृत्ती धारण केली आहे. या कंपनीचा हा नियम सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. गुआंगडॉग राज्यातील डॉन्ग गुआंगमध्ये ही कंपनी असून दिवसातून एक टॉयलेट ब्रेक पॉलिस कंपनीने स्वीकारली आहे. कंपनीतील कर्मचारी एकापेक्षा जास्त वेळा टॉयलेट गेले तर त्यांच्याकडून २० युआन म्हणजेच ३ डॉलर (जवळपास २२० रुपये)दंड भरावा लागणार आहे.

- Advertisement -

यामुळे उचलले कंपनीने असे पाऊल

कंपनीने हे असे पाऊल आळशा कर्मचाऱ्यांसाठी उचलले आहे. जे कामापासून पळ काढण्यासाठी मुद्दाम अनेक वेळा टॉयलेटचा ब्रेक घेतात. याबाबत कंपनीने कर्मचाऱ्यांसोबत अनेकदा चर्चा केली, पण त्यांच्यात काहीच बदल झाला नाही आहे, अशी कंपनीच्या प्रवक्तांनी माहिती दिली आहे. त्यामुळे कंपनीने हे अजब पाऊल उचलले आहे. कंपनीने याबाबत जारी केलेली नोटीस कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. तसेच अनेकांनी कंपनीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीची ही नोटीस व्हायरल झाल्यानंतर ७ कर्मचाऱ्यांना २० आणि २१ डिसेंबरला काढून टाकण्यात आले आहे. जरी सोशल मीडियावरून कंपनीवर टीका होत असली, तरी कंपनी त्यांच्या निर्णयावर ठाम आहे.


हेही वाचा – Breast Implant सर्जरीत मृत्यू खूपच जवळून पाहिला, अमेरिकन मॉडेलचा थरारक अनुभव

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -