रात्रीच्या अंधारात हत्तीच्या पिल्लांची रस्त्यावर धमाल; व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, हत्तींचा एक समूह चाऱ्याच्या शोधात फिरत आहेत. जेव्हा ते चारा खातात, तेव्हा त्यांची पिल्लं एकमेकांसोबत खेळताना दिसत आहेत

प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ सोशल मीडिया युजर्स देखील आवडीने पाहतात. आता असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. जो पाहून तुम्ही देखील खूप खूश व्हाल. आईएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर एक हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात रात्रीच्या वेळी दोन हत्तीची पिल्लं एकमेकांसोबत खेळताना दिसत असून त्या पिल्लांचे आई-वडील शेजारच्या एका ठिकाणी चारा खाताना दिसत आहेत. या व्हिडीओला आत्तापर्यंत जवळपास ३८ हजारांपेक्षा जास्त व्यूज मिळाल्या आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, हत्तींचा एक समूह चाऱ्याच्या शोधात फिरत आहेत. जेव्हा ते चारा खातात, तेव्हा त्यांची पिल्लं एकमेकांसोबत खेळताना दिसत आहेत. त्यांचा निरागसपणा तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल.

या व्हायरल व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, जेव्हा त्या पिल्लांचे आई-वडील चारा खाण्यामध्ये व्यस्त आहेत. तेव्हा त्यांची दोन पिल्लं बाहेर आली. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडत आहे. तसेच अनेकजण या व्हिडीओवर कमेंट देखील करत आहेत.


हेही वाचा :कधी गायीच्या कुशीत तर कधी मानेवर बसून खेळतोय हा चिमुकला; व्हिडीओ व्हायरल