घरट्रेंडिंगIndian Coast Guard Recruitment: भारतीय तटरक्षक दलात ३५० जागांसाठी भरती; १६ जुलैपर्यंत...

Indian Coast Guard Recruitment: भारतीय तटरक्षक दलात ३५० जागांसाठी भरती; १६ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Subscribe

भारतीय तटरक्षक दलाने म्हणजे Indian Coast Guard ने जानेवारी २०२२ बॅचसाठी नाविक जनरल ड्यूटी (जीडी), नाविक डोमेस्टिक ब्रांच (डीबी) आणि मेकॅनिकल या पदावर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत joinindiancoastguard.gov.in येथे भेट देऊन अर्ज भरू शकतात. इंडियन कोस्ट गार्ड पदांची भरती २०२१ या साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया २ जुलै २०२१ पासून सुरू होणार आहे. यासाठी उमेदवार १६ जुलै २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.

जाणून घ्या, पदांच्या भरतीसंदर्भात

  • इंडियन कोस्ट गार्ड भरती २०२१ च्या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून विविध पदांसाठी एकूण ३५० पदे भरती केली जातील.
  • नाविक जनरल ड्यूटी (जीडी) २६० पदं
  • नविक (देशांतर्गत शाखा) -५० पदं
  • मॅकेनिकल यांत्रिक – २० पदं
  • विद्युत यांत्रिक – १३ पदं
  • इलेक्ट्रॉनिक्स यांत्रिक -७ पदं

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा १८ वर्षांवरून २२ वर्षांपर्यंत निश्चित केली आहे. नाविक जनरल ड्यूटी आणि घरगुती शाखा या पदावर नियुक्त होण्यासाठी पात्र उमेदवारांना वेतन पातळी ३ अंतर्गत २१७००रुपये मूलभूत वेतन व इतर लागू भत्त्यासह देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे, यांत्रिक पदासाठी मूलभूत वेतन २९ हदार २०० रुपये, वेतन पातळी ५ आणि डीएसह इतर अनेक भत्ते देण्यात येणार असल्याचे सांगिकले जात आहे.

- Advertisement -

नाविक (जनरल ड्यूटी)- काउंसिल ऑफ बोर्ड्स फॉर स्कूल एजुकेशन द्वारा मान्यता प्राप्त शिक्षा बोर्डासह गणित और फिजिक्स के साथ १२ वीं पास होना चाहिए. दरम्यान, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या संस्थेतर्फे शालेय शिक्षण मंडळाने मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाकडून दहावी पास आणि इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) मधील अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -