सेल्फी विकून तरुण झाला करोडपती

सेल्फी विकून करोडपती झालेला हा २२ वर्षीय तरुण कोण आहे? वाचा

Indonesian Student Becomes a Millionaire Selling Selfies as NFTs on OpenSea Marketplace
सेल्फी विकून तरुण झाला करोडपती

सेल्फी विकून कोणी कोट्यवधी होऊ शकतो, असा एकदा जरी विचार केला जरी हैराण व्हायला होते. परंतु हे सत्य आहे. २२ वर्षांच्या मुलाने सेल्फी विकून £733,500 (७ कोटी रुपयांहून अधिक) पैसे कमावले आहेत. डेल्टी स्टारने इंडोनिशयात राहणाऱ्या या तरुणांची यशाची गोष्ट प्रकाशित केली आहे. आता हे सर्व कसे घडले? सेल्फी विकून मुलगा करोडपती कसा बनला? हे आपण आज पाहणार आहोत.

या २२ वर्षीय तरुणाचे नाव सुलतान गुस्ताफ अल गोझाली (Sultan Gustaf Al Ghozali) असे आहे. तो कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे. सुलतानने आपल्या १८ वर्षाच्या वयात १००० सेल्फी घेतले. त्याने या सेल्फीचा एक व्हिडिओ प्रोजेक्ट ‘गोझाली एव्रीडे’ नावाने बनवला. सुरुवातीला हा व्हिडिओ बनवताना लोकांसाठी हास्यास्पद वाटेल या विचाराणे केला होता. परंतु सुलतानाचा हा प्रोजेक्ट आणि फोटो एनएफटीने (NFT: Non-Fungible Token) खरेदी केला.

NFT हा डिजिलटल आयटम आहे, जे ब्लॉकचेन टेक्नोलॉजी (Blockchain Techonology)चा वापर करून खरेदी आणि विक्री करते. माहितीनुसार, क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrencies) आणि एनएफटी स्पेशलाईज्ड प्लेटफॉर्मवर याची खरेदी आणि विक्री केली जाते.

NFT कॉलेक्टर्सने गोझालीचा वरील फोटो खरेदी केला. गोझालीने आपले सेल्फी क्रिप्टोकरन्सीसाठी एनएफटीच्या लिलाव साईट OpenSeaवर विकले. गोझाली म्हणाला की, मी कधी विचार केला नव्हता की, माझे सेल्फी कोणी खरेदी करेल. याची किंमत तेव्हा ३ डॉलर ठेवली होती. परंतु जेव्हा एका सेलिब्रिटी शेफने खरेदी केली आणि त्याचे प्रमोशन सोशल मीडियावर केले, तर ४००हून अधिक लोकांनी सेल्फी खरेदी केले. यामुळे गोझाली करोडपती झाला आहे. परंतु याबाबतची माहिती त्याने नातेवाईकांना दिली नाही.

गोझालीचे ट्वीटरवर ४० हजार फॉलोअर्स आहेत. जेव्हा लिलाव होणार होता तेव्हा याबाबतचे अपडेट गोझाली सातत्याने शेअर करत होता. अलीकडे या २२ वर्षीय तरुण विद्यार्थ्याने इन्कम टॅक्स भरला आहे.

NFT काय आहे?

२०१४ साली सर्वात पहिल्यांदा Non-fungible token (NFT) नजरेस आली होती. NFTचा एक वेगवेगळा अपरिवर्तनीय डेटा आहे. जो खऱ्या जगात दिसतो. यामध्ये लोकं क्रिप्टोकरन्सीचा वापर करून ओरिजनल कॉपी डिजिटल आर्टची खरेदी विक्री करते. प्रत्येक डिजिटल आर्टचा एक यूनिक कोड असतो.


हेही वाचा – Video Viral: पोलिसांच्या तपासादरम्यान कैद्याने चक्क मोबाईल फोनच गिळला; डॉक्टरांनी विना ऑपरेशन शरीराबाहेर काढला