घरट्रेंडिंगInternational Beer Day: कोरोनामुक्त झाल्यानंतर केस गळताहेत ? बीयरचे असेही फायदे

International Beer Day: कोरोनामुक्त झाल्यानंतर केस गळताहेत ? बीयरचे असेही फायदे

Subscribe

बीयर अनेक गोष्टींवर फायदेशीर आहे. योग्य प्रमाणात जर बीअरचे सेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम देखील होत नाहीत.

कोरोनामुक्तीनंतर आता अनेक जण केस गळतीचा सामना करत आहेत. केस गळतीच्या समस्येमुळे अनेकजण त्रस्त झालेत. केस गळतीवर अनेक उपाय केले जात आहे. खरंतर बीयर पिणे हे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी देखील चांगले असल्याचे म्हटले जाते. त्याचप्रमाणे किडनी स्टोन असणाऱ्या लोकांना देखील बीयरचे सेवन करणे चांगले मानले जाते. आज देशभरात आंतरराष्ट्रीय बीयर दिवस (International Beer Day)  म्हणून साजरा केला जातो. चहा आणि कॉफी नंतर जगभरात तिसऱ्या क्रमांकावर असलेले प्रसिद्ध पेय म्हणजे बीयर.  बीयर अनेक गोष्टींवर फायदेशीर आहे. योग्य प्रमाणात जर बीअरचे सेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम देखील होत नाहीत. डॉक्टर देखील बऱ्याचदा औषध म्हणून बीयर पिण्याचा सल्ला देतात. शोधकर्त्याच्या माहितीनुसार, दिवसाला ३५० मिली बीयर पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आज बीयर डेच्या दिवशी जाणून घ्या बीयर पिण्याचे फायदे. (International Beer Day: Hair Loss post covid?benefits of beer)

बीयरचे फायदे

- Advertisement -
  • केसातील कोंडा कमी करण्यासाठी बीयर पिणे हा एक उत्तम उपाय समजला जातो. बीयरमध्ये यीस्ट आणि व्हिटामिन मोठ्या प्रमाणात असतात जे कोंडा कमी करण्यास मदत करतात.
  • किडनी स्टोन असलेल्या लोकांना बीयर पिण्याचा सल्ला दिला जातो. किडनी स्टोन असलेल्या लोकांनी दररोज एक बीयर पिल्यास यूरीनद्वारे हळूहळू स्टोन निघून जातो.
  • अमेरिकेच्या पेन्सिलव्हेनिया विद्यापिठात करण्यात आलेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, बीयर पिल्याने रक्त परिसंचारण करणाऱ्या रक्तवाहिन्या लवचिक होतात त्यामुळे रक्ताभिसरण जलद होते. शरिरातील रक्त गोठण्याचा धोका देखील कमी होतो. मध्यमवर्गीय वयातील मुले दररोज १-२ ग्लास बीयर पितात त्यांचा डायबिटीजचा धोका २५ टक्क्यांनी कमी होतो.
  • बीयरमुळे शरीरातील गुड कोलेस्ट्रोल वाढवते ज्यामुळे मेंदूला होणारा रक्तप्रवाह चांगला होतो.

बीयर पिण्याचे तोटे

  • जास्त प्रमाणात बीयरचे सेवन केल्यास डायबिटजसारख्या आजाराचा धोका वाढतो.
  • प्रेग्नंसीमध्ये बीयर पिल्यास गर्भवती महिलेचे आणि तिचे बाळाचे मानसिक व शारीरिक नुकसान होऊ शकते.
  • जास्त प्रमाणात बीयर पिल्यास स्ट्रोक आणि यकृताच्या समस्येचा धोका वाढू शकतो. त्यामुळे रक्तदाब असलेल्या रुग्णांनी बीयर पिणे टाळावे.

हेही वाचा – Weight Loss Tips: दररोज व्यायम करुन वजन कमी होत नाहीये? तर फॉलो करा ‘या’ महत्त्वाच्या टिप्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -