International Yoga Day 2022 : २१ जूनलाच योग दिन का साजरा करतात? या दिनाची सुरुवात कशी झाली?

योगविद्येची जनजागृती व्हावी आणि या विद्येचा जगभर प्रसार व्हावा याकरता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला. २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला.

narendra modi yoga

तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग (Yoga). भारतीय संस्कृतीत योगाला अनन्यासाधारण महत्त्व आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून योगाचा प्रचार आणि प्रसार भारताकडून वाढला आहे. योगासनांचा लाभ घेत शरीर आणि मनाचे स्वास्थ्य राखले जाते. त्यामुळे या धावपळीच्या युगात योगा करण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून केले जाते. (International Yoga Day 2022- know more and history about this day)

आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात कशी झाली?

योगविद्या (Yogvidya) ही भारताची प्राचीन परंपरा आहे. तन आणि मनाचे योग्य संतुलन राखण्यासाठी योगसाधना केली जाते. मात्र, ही प्राचीन विद्या असली तरीही जनमाणसांत याविषयी जनजागृती झालेली नव्हती. शिवाय, योगाविषयी अनेक गैरसमजही पसरलेले होते. त्यामुळे योगविद्येची जनजागृती व्हावी आणि या विद्येचा जगभर प्रसार व्हावा याकरता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला. २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला. या प्रस्तावाला १९३ देशांपैकी १७५ देशांनी होकार दिला. त्यानंतर, या प्रस्तावावर डिसेंबर २०१४ मध्ये सविस्तर चर्चा होऊन आंतरराष्ट्रीय योग दिनाला मंजुरी मिळाली.

हेही वाचा – ११ वर्षीय दीपाची ऑलिम्पियाडसाठी निवड, मोदींना देणार योगाचे धडे

पहिला योगदिन कार्यक्रमात दोन जागतिक पराक्रम

डिसेंबर २०१४ मध्ये प्रस्तावाला परवानगी मिळाल्यानंतर २१ जून २०१५ रोजी पहिल्यांदा योग दिन साजरा करण्यात आला. या दिवशी जगभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीतील राजपथावर झालेल्या कार्यक्रमात स्वतः नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहून योगासने केली. या कार्यक्रमात ३५ हजार ९८५ लोकांनी सहभाग नोंदवला होता. तसेच, एकाच योगवर्गात जवळपास ८४ देशातील नागरिक सहभागी झाले होते. त्यामुळे या कार्यक्रमात दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World of Record) झाले आहेत.

२१ जूनच का?

जगभरातील अनेक देशांमध्ये २१ जून हा सर्वांत मोठा दिवस असतो. सूर्याभोवती फिरण्यासाठी पृथ्वीला लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस मोठा दिवस असतो. म्हणजेच, या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. २१ जून दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. या दिवशी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकळी उशिरापर्यंत उजेड असतो. म्हणजे, अंधार उशिरा होता. म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा व्हावा असा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

यावर्षीची थीम काय?

प्रत्येक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिनाला विशिष्ट थीम दिली जाते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिनासाठीही थीम ठरवली जाते. यंदा मानवतेसाठी योग (Yog For Huminity) अशी थीम ठेवण्यात आली आहे. कोरोनामुळे शरीरासोबत मानवी मनावरही विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे Yog For Huminity अशी थीम ठेवण्यात आली आहे.

आतापर्यंतची थीम

२०१७ मध्ये ‘आरोग्यासाठी योग’ (Yoga for health) अशी थीम ठेवण्यात आली होती. तर, २०१८ मध्ये ‘शांततेसाठी योग’ (Yoga for Peace), २०१९ मध्ये ‘हृदयासाठी योग’ (Yoga for Heart), २०२० मध्ये ‘कौटुंबिक योग’ (Yoga at Home and Yoga with Family) आणि २०२१ मध्ये ‘कल्याणकारी योग’ (Yoga for well-being)अशी थीम ठेवण्यात आली होती.