घरट्रेंडिंगVideo: इथे सगळं फुकट मिळेल अट फक्त एकच!

Video: इथे सगळं फुकट मिळेल अट फक्त एकच!

Subscribe

गणित म्हटलं की काही जणांच्या तोंडावर बारा वाजतात तर काहीजण उत्साहित होतात. कल्पना करा जर तुम्हाला दुकानात गेल्यावर गणितबाबत दुकानदाराने एखादा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर आल्यानंतर त्याने तुम्हाला ५ सेकंदात कोणत्याही वस्तू मोफत घ्यायला सांगितल्या. तर तुम्हाला किती आनंद होईल. असंच काहीस न्यूयॉर्क येथील ब्रॉन्क्समधील लकी कँडी स्टोअरमधील ग्राहकांसोबत घडलं आहे. २० वर्षीय अहमद अलवानने २ आठवड्यांपूर्वी ग्राहकांसोबत हा गेम खेळण्यास सुरुवात केली.

View this post on Instagram

She tried to take me with her ?? #explorepage

A post shared by Ahmed Alwan (@_itsmedyy_) on

- Advertisement -

अहमदने स्टोअरमध्ये आलेल्या ग्राहकांना गणिता संदर्भातील काही सोपे प्रश्न विचारले. त्यानंतर जो ग्राहक बरोबर उत्तर देईल त्या ग्राहकांना शेल्फमधून जे हवं आहे ते घेण्यासाठी त्यांना ५ सेकंद दिलं. विशेष म्हणजे या ५ सेकंदात ज्या वस्तू घेतली त्या वस्तू मोफत असतील.

- Advertisement -

ग्राहकांचा हा गेम खेळतानाचा व्हिडिओ शूट केल्यामुळे अहमद आणि त्याचा गेम सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसंच टिक-टॉकवर देखील चर्चेत आला आहे. अहमदने सीएनएनला सांगितलं, ‘मला लोकांना मदत करायची होती. पण मला मज्जा देखील करायची होती. म्हणून मी एक टिक-टॉक व्हिडिओ तयार केला आणि मी त्यांना गणिता संदर्भात प्रश्न विचारून आव्हान केलं. लोकांचे मनोरंजन करणे आणि शिक्षणाची गरज किती आहे हे पटवून देण्याचा माझा हेतू होता. तसंच त्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची देखील प्रयत्न होता.’

तर पाहा या भन्नाट गेमचा व्हिडिओ…


हेही वाचा – Video: पोलवरून १५ फूट खाली पडली तरी डान्स करू लागली!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -