घरट्रेंडिंगमशिदीवरील भोंगे आता बंद करा; जावेद अख्तर यांची मागणी

मशिदीवरील भोंगे आता बंद करा; जावेद अख्तर यांची मागणी

Subscribe

बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर हे आपल्या परखड मतांचे प्रदर्शन करण्यासाठी ओळखले जातात. अनेक सामाजिक, राजकीय मुद्द्यावर ते बेधडक आपले मत मांडत असतात. नुकतेच त्यांनी ट्विटरवर एक आणखी रोखठोक मात्र तितकेच वादग्रस्त विधान केले आहे. जावेद अख्तर यांनी मशिदीवर लाऊडस्पीकरद्वारे होणारी अजान बंद करण्यास सांगितले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे मात्र सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेकांनी अख्तर यांच्या मागणीचे स्वागत केले आहे. तर मुस्लिम समाजातील काही कट्टरपंथियांनी अख्तर यांचा विरोध केला आहे.

- Advertisement -

जावेद अख्तर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की, “भारतात जवळपास ५० वर्षापूर्वी लाऊडस्पीकरवरील अजान देणे हराम मानले गेले. मात्र ती पद्धत अजूनही संपलेली नाही. ही पद्धत संपली पाहीजे. आशा आहे की इतरांना जो त्रास होतोय, तो पाहता लाऊडस्पीकरवरील अजान आता बंद झाली पाहीजे.” अख्तर यांच्या या ट्विटमुळे जुन्या कढीला पुन्हा ऊत आला आहे. ट्विटरवर ३३ हजार लोकांनी त्यांचे ट्विट लाईक केले आहे, तर ६ हजार लोकांनी त्यांना रिट्विट केले आहे.

जावेद अख्तर यांच्या आधी काही वर्षांपूर्वी गायक सोनू निगम याने देखील मशिदीवरील भोंग्याचा विषय काढला होता. सोनू निमग म्हणाला होता की, त्याच्या घराजवळ खूप साऱ्या मशिदी आहेत. सकाळी सकाळी तिथे भोंग्यावर अजान सुरु होते. त्याला ही अजान ऐकायची नाही. मात्र लाऊडस्पीकरमुळे त्याला ती ऐकावी लागते. मात्र सोनू निगमच्या वक्तव्यानंतर बरीच टीका झाली होती. मात्र आता मुस्लिम समुदायातीलच अख्तर यांनी ही मागणी केल्यामुळे इतर लोक त्यांचे स्वागत करत आहेत.

- Advertisement -

ट्विटरवर अख्तर यांच्या ट्विटनंतर घमासान कमेंट वॉर सुरु आहे. काही मुस्लिम बांधवांनी या ट्विटचा निषेधे केला आहे. तर काहींना त्यांचे स्वागत केले आहे. काही ट्विटर युजर्सना तर स्वतः अख्तर यांनीच उत्तर दिले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -