घरट्रेंडिंगVideo: तीर्थयात्रा करण्यासाठी कुत्रा चक्क चालला ४८० किलोमीटर!

Video: तीर्थयात्रा करण्यासाठी कुत्रा चक्क चालला ४८० किलोमीटर!

Subscribe

या व्हिडिओमधील कुत्र्याला शबरीमलाला जाण्याची इच्छा असल्याचे भक्तांनी सांगितले.

सध्या एका कुत्र्याची भन्नाट घटना सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या कुत्र्याबद्दल जेव्हा तुम्हाला कळेळं तेव्हा तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. चक्क या भटक्या कुत्र्याने शबरीमलाला जाण्यासाठी १३ भक्तांसोबत ४८० किलोमीटरचा प्रवास केला आहे. आंधप्रदेशातील भक्तांनी ३१ ऑक्टोबर रोजी तिरुमला येथून तीर्थयात्राचा प्रवास करायला सुरुवात केली होती.

आता हा कुत्रा तीर्थयात्रा करणाऱ्यांसोबत चिकमंगळूर जिल्ह्यातील कोट्टिघारामध्ये पोहचला आहे. या तीर्थयात्रेमधील एक भक्त म्हणाला की, ‘आम्ही पहिल्यांदा या कुत्र्याला दुर्लक्ष केले आणि चालत राहिलो. एक तास झाल्यानंतरही तो कुत्रा आमच्यासोबत चालत होता. आम्ही सगळे हैरान झालो. नंतर तो आमच्यासोबत तासनतास चालत राहिला. त्यानंतर आम्हाला कळलं की या कुत्र्याची आमच्यासोबत शबरीमलाला येण्याची इच्छा आहे. मग आम्ही त्याला खायला दिलं. दरवर्षी आम्ही तीर्थयात्रा करण्यासाठी निघतो. पण यंदा आम्हाला एक वेगळा अनुभव आला.’

- Advertisement -

सध्या या कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १७ हजार व्हूज मिळाले असून १ हजार लाईक्स आणि ४०० पेक्षा जास्त रिट्विट केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राष्ट्रवादीच्या बैठकीत फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ डायलॉगची चर्चा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -