Video: साडीनेसून लग्नाला निघालेल्या महिलेने सापाला पकडण्यासाठी अशी लावली शक्कल!

Karnataka Woman Dressed In Saree Capturing A Snake Video Is Going Viral
Video: साडीनेसून लग्नाला निघालेल्या महिलेने सापाला पकडण्यासाठी अशी लावली शक्कल!

एक महिला साडी नेसून लग्नाला जात होती. पण त्यादरम्यान तिला घरात लपलेला साप पकडण्यासाठी बोलवण्यात आले. त्या सापाला तिने शानदार प्रकारे पकडले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सगळे आश्चर्यचकीत होत आहेत. या व्हिडिओमधील महिलेचे नाव निर्जरा चिट्टी असे आहे. ती कर्नाटकची असून ती साप वाचवण्याचे काम करते. तिने अतिशय शांतपणे लपलेल्या साप पकडला आहे. त्यामुळे तिथे असलेले लोक तिला पाहतच राहिले आणि मोबाईलवर शुटींग करू लागले.

हा व्हिडिओ ट्विटरवर तीन दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता आणि त्यानंतर तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला. यामधील महिला साडीत अतिशय शांतपणे सापाला पकडताना दिसत आहे. तिने साप पकडण्यात एका काठीचा वापर केला आहे. सध्या तिच्या या साप पकडण्याच्या स्टाईल बाबत कौतुक केले जात आहे.

ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, ‘साप पकडणारी विराट भगिणी लग्नासाठी तयार होत होती. तेव्हा तिला घरी साप पकडण्यासाठी बोलावले गेले. तिने कोणत्याही उपकरणांशिवाय साप पकडला.’ आतापर्यंत या व्हिडिओला ४.५ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ९ हजारांहून अधिक लाईक्स आणि २ हजारांहून अधिक जणांनी रिट्विट केले आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत असून सध्या त्या व्हिडिओमधल्या महिलेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


हेही वाचा – ‘या’ व्यक्तीने शंभर खोल्यांमध्ये ३९ बायकांबरोबर थाटलाय संसार!