Karwa Chauth 2021: करवा चौथसाठी गडद मेहंदीच्या काही खास टिप्स

करवा चौथच्या निमित्ताने महिला प्रामुख्याने हातावर मेहंदी काढतात

हिंदू धर्मात कोणत्याही सणाला महिलांच्या साज शृंगाराला विशेष महत्त्व आहे. लग्न असो किंवा करवा चौथ महिलांच्या हातावर मेंहदी काढण्याचा विशेष कार्यक्रम असतो. मेहंदी महिलांचे सौंदर्य आणखी खुलवते असे म्हटले जाते. करवा चौथच्या निमित्ताने महिला प्रामुख्याने हातावर मेहंदी काढतात. मेहंदी काढण्यासाठी करवा चौथ हा सण विशेष मानला जातो. मेहंदी काढल्यानंतर अनेक महिलांची मेहंदी न रंगल्याच्या तक्रारी येतात. मेहंदी रंगण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मात्र तरीही मेहंदी रंगत नाही. मेहंदी रंगण्याचे प्रमुख कारण असते ते म्हणजे आपल्या शरिरातील उष्णता. शरिरात जितकी जास्त उष्णता तितका मेहंदीचा रंग उजळतो. मात्र ज्यांच्या शरिरात उष्णता कमी आहे त्यांची काय करायचे आहे. जाणून घ्या हातावरच्या मेहंदीचा रंग खुलवण्यासाठी काही खास टिप्स.

हातावरच्या मेहंदीचा रंग खुलवण्यासाठी काही खास टिप्स.

  • हातावर मेहंदी काढण्याआधी स्वच्छ धुवून घ्या.
  • मेहंदी काढून झाल्यावर कमीत कमी ५ तास हातावर राहूद्यात.
  • मेहंदी रंगण्यासाठी हाताला निलगिरीचे तेल लावू शकता.
  • मेहंदी सुकल्यानंतर कापसाच्या सहाय्याने लिंबू आणि साखरेचे पाणी लावू शकता.
  • मेहंदी छान रंगावी असे वाटत असेल तर कमीत कमी वेळा पाण्यात हात टाका.
  • त्याचप्रमाणे मेहंदी रंगण्यासाठी हाताला बाम, आयोडेक्स किंवा विक्स लावू शकता. यामुळे हाताला उष्णता मिळते आणि मेहंदी रंगण्यास मदत होते.
  • मेहंदी रंगण्यासाठी हाताला लवंगीची धुरी देखील देऊ शकता.
  • अनेक जण मेहंदी रंगावी यासाठी हाताला चुना देखील लावतात.

हेही वाचा – Ganesh Chaturthi 2021 : बाल गणेश साकारणाऱ्या अवलियाकडे २०२३ पर्यंत ऑर्डर फुल्ल