Khush Rahiye: गरजूंच्या टिफिन बॉक्सवर चिमुरड्याने लिहिलेल्या संदेशाने जिंकली सर्वांची मने

सोशल मीडियावर अनेकांनी अद्विकला दिली शाबसकी

Khush Rahiye: little boy message on tiffin box wins hearts,his mother makes tiffin for covi19 patients
Khush Rahiye: गरजूंच्या टिफिन बॉक्सवर चिमुरड्याने लिहिलेल्या संदेशाने जिंकली सर्वांची मने

देशात कोरोना महामारीमुळे सर्वजण हैराण झाले आहेत. देशात रोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे लोक घाबरले आहेत. आजूबाजूला सर्वत्र नकारात्मकता आहे. अशा परिस्थितीत सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलाचे फोटो व्हायरल होत आहेत. जे पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले आहे. सर्वजण त्या मुलाचे कौतुक आहेत. कोरोनाच्या काळात हा मुलगा सर्वत्र पॉझिटिव्ह संदेश देत आहे. या मुलाचे नाव आहे अद्विक. अद्विकचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हा मुलागा जेवणाच्या डब्यांवर ‘खुश रहिये’ असा मेसेज लिहित आहे. कोरोना काळात कोणाचा कोण असलेल्या अद्विकने दिलेल्या या मेसेजमुळे कोरोना रुग्ण त्याचबरोबर इतरांनाही सकारात्मक प्रेरणा मिळाली आहे.


अद्विकच्या मामाने त्याचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अद्विकची आई कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी जेवणाचे डबे तयार करते. त्यानंतर जेवणाच्या डब्यांवर अद्विक कोरोना रुग्णांसाठी एक खास मेसेज लिहितो. एका नाहीतर सर्व डब्यांवर अद्विक त्याच्या हस्ताक्षरात आनंदी रहा,खुश रहिये असा मोलाचा मेसेज लिहितो. गरजूंच्या टिफिन बॉक्सवर चिमुरड्याने लिहिलेल्या संदेशाने सर्वांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी अद्विकला शाबसकी दिली आहे.

आनंदी रहा आणि दुसऱ्या आनंदी ठेवा, माझा भाचा अद्विक सर्वांना खुश रहिये असा मेसेज देऊन कोरोना रुग्णांपर्यंत जेवणाच्या डब्यांसोबतच आनंद देत आहे, असे म्हणत अद्विकच्या मामाने त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोत हिरव्या रंगाचे टिशर्ट घातलेला अद्विक गुंग होऊन डब्यांच्या झाकणांवर खुश रहिये असा मेसेज लिहिताना दिसत आहे. कोरोना काळातील सर्वात छोटा वॉरियर म्हणून अद्विकचे कौतुक केले जात आहे.


हेही वाचा – खाकीला सॅल्युट ! कॉन्स्टेबलचे २० वर्षात ५० हजार बेवारसांचे अंत्यसंस्कार