घरट्रेंडिंगसिंहाऐवजी वाघाला का देण्यात आला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा?

सिंहाऐवजी वाघाला का देण्यात आला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा?

Subscribe

राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने ९ जुलै १९६९ रोजी म्हणजे आजच्या दिवशी सिंहाला देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले. त्यानंतर १९७३ साली सिंहाच्या जागी वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून स्थान देण्यात आले. त्यामुळे सिंहाऐवजी आता वाघ हा देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखला जातो. परंतु कोणत्याही प्राण्याला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यामागे काय मापदंड असतात? जाणू घेऊ या…

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९७२ मध्ये पहिल्यांदाच आजच्या दिवशी भारताचा राष्ट्रीय प्राणी सिंहाची जागा रॉयल बंगाल टायगरने घेतली होती. त्यामुळे वाघ हाच भारताचा राष्ट्रीय प्राणी मानला जाऊ लागला. यावर २०२१५ मध्ये झारखंड राज्यसभेचे खासदार परिमाल नाथवानी यांनी वाघाऐवजी सिंहाला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा या मागणीसाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाला प्रस्ताव पाठवला. मात्र तो प्रस्ताव पुढे सरकलाच नाही.

- Advertisement -

सिंहांच्या प्रजातीमुळे एकेकाळी भारताला विशेष ओळख

आशिया खंडातील सिंहांच्या प्रजातीमुळे एकेकाळी भारताला विशेष ओळख प्राप्त झाली होती. विशेषत: अशोकाच्या काळात सिंहांना ऐतिहासिक प्रतीक म्हणून मानले गेले. एक काळ असा होता की, मध्यप्रदेश गुजरात, झारखंड. दिल्ली, हरियाणा आणि गुरजरातमध्ये सिंहाची संख्या सर्वाधिक होती. परंतु हळूहळू विविध कारणांमुळे त्यांचा अधिवास कमी होत गेला. आजच्या घडीला गुजरातच्या गिरवन जंगताचं सिंहांचा अधिवास पाहायला मिळतो.
अशी माहिती वन्यजीव तज्ज्ञ डॉ. फैजाज खुदसर यांनी दिली.

रॉयल बंगाल टायगरची संख्या सर्वाधिक कमी

पण दुसरीकडे भारतात वाघ किंवा रॉयल बंगाल टायगरची संख्या सर्वाधिक कमी होत आहे. त्यामुळे जगभरात आता वाघ वाचवा मोहिमेला महत्त्व प्राप्त झाले आहे. आज भारतातील वाघांची आकडेवारी लक्षात घेतल्यास, देशातील १६ राज्यांत वाघांचा अधिवास पाहायला मिळतो. परंतु तोही काही भागांत नष्ट होण्याचा मार्गावर आहे. पण मध्यप्रदेशला पुन्हा एकदा टायगर स्टेट म्हणून ओळख मिळत आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने १९७२ साली वाघ हा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले. याचदरम्यान प्रोजेक्ट टायगरला सुरुवात झाली. हा प्रोजेक्ट देशातील मोठ्या प्राण्यांना वाचवण्यासाठीचा महत्त्वपूर्ण होता.

- Advertisement -

भारतात मांजरींच्या ३६ पेक्षा जास्त प्रजाती

भारत आणि आशियामध्ये फक्त बंगाल वाघ आढळतात. भारतात मांजरींच्या ३६ पेक्षा जास्त प्रजाती आहेत. त्यांच्यातील सर्वात मोठी मांजर म्हणजे वाघ (टायगर). भारतात बंगालचे वाघ सिंहापेक्षा मोठे आहेत आणि त्यांच्या विशेष गुणांमुळे त्यांना जंगलचा राजा म्हटले जाते .बंगाल टायगर सिंहाप्रमाणे कळपात न राहता एकटे राहणे पसंत करतो. ते नेहमी मोकळेपणाने फिरत शिकार करतो.

दरम्यान भारतात एकेकाळी राजांकडून वाघांची शिकार होऊ लागली ही शिकार एक गौरवाची बाब मानली जायची. यामुळे भारतातील वाघांची संख्या कमी होऊ लागली. त्यानंतर ‘टायगर प्रोजेक्ट’ म्हणजेच व्याघ्र प्रकल्पाला सुरुवात झाली. या प्रकल्पातून भारतातील वाघांचे जतन व संवर्धनासाठी काम सुरु करण्यात आले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -