घरट्रेंडिंगसेक्स कोणासोबत करायचे हे देखील न्यायालय सांगणार!

सेक्स कोणासोबत करायचे हे देखील न्यायालय सांगणार!

Subscribe

मैत्री, प्रेम, लग्न आणि सेक्स करणं ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे. मात्र आता सेक्स करताना ते कोणासोबत करणार हे २४ तास आधीच पोलिसांना सांगावे लागणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. दरम्यान यासंदर्भात न्यायालयाकडून निर्बंध घालण्यात आले असून याबाबत पोलिसांना सेक्स करण्यापूर्वी कोणासोबत सेक्स करणार याची माहिती सांगणं बंधनकारक असणार आहे. हा अजब प्रकार युनायटेड किंग्डममधील न्यायालयाने एका प्रकरणामध्ये आरोपीला एक विचित्र अट घातल्यानंतर चर्चेत आला आहे. युनायटेड किंग्डममधील न्यायालयाने लैंगिक शोषणाचा आरोप असणाऱ्या या व्यक्तीला महिलांपासून दूर ठेवण्याठी न्यायालयाने एक विचित्र अट या व्यक्तीला घातली असल्याचे समोर आले आहे. यानुसार, एखाद्या व्यक्तीला कोणत्याही महिलेसोबत सेक्स करण्यापूर्वी २४ तास आधी त्यासंदर्भात माहिती पोलिसांना देणं बंधनकारक असणार आहे.

असा घडला प्रकार

युनायटेड किंग्डममधील न्यायालयाने एका प्रकरणामध्ये आरोपीला एक विचित्र अट घातली. या आरोपीचं नाव डीन डेअर असं असून त्याचे वय ३९ वर्ष आहे. डीन या व्यक्तीन अनेकदा सेक्स करताना लैंगिक उत्तेजनातून महिलांवर हल्ला केला. या प्रकारामध्ये त्याने लहानग्या १४ वर्षीय मुलीवर हल्ला करत तिचा गैरफायदा घेण्याचा देखील प्रयत्न केला आणि हाच प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आला.

- Advertisement -

कोण आहे ही डीन?

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम लंडनमधील नॉटींग हिल्स येथे राहणारा, वयवर्ष ३९ असणारा डीन हा इमारतींचे बांधकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एक आहे. डीनने आतापर्यंत अनेक महिलांसोबत छेड-छाड करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे. या कारणामुळेच न्यायालयाने आता त्याच्यावर अनेक निर्बंध लादले आहे. दैनंदिन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच महिलांशी डीनने संवाद साधावा, असे न्यायालयाकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे. तसेच, द मेट्रोने दिलेल्या वृत्तानुसार, वेस्टमिनिस्टर न्यायदंडाधिकाऱ्यांनी असे सांगितले की, बस कंडक्टर, दुकानदार किंवा टॅक्सी चालक महिला असेल तर तिच्याशी डीनने कामापुरतंच संवाद साधावा. तसेच डीनला सेक्स करण्याची इच्छा झाली तर त्याने, आपल्या महिला जोडीदाराला आणि चारिंग क्रॉस पोलीस स्थानकामध्ये यासंदर्भात २४ तासांपूर्वी यासंदर्भात कळवणे बंधनकारक आहे, असंही न्यायालयाने यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -