Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग Video: ...आणि पाण्यातून जमीनच बाहेर आली

Video: …आणि पाण्यातून जमीनच बाहेर आली

व्हिडिओ सोशल मीडियावर आतापर्यंत ६.१ लाख लोकांनी पाहिलाय

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सोशल मीडियावरील अनेक गोष्टी, घटना, प्रसंग आपली झोप उडवतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा हाहा:कार पहायला मिळतोय. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. जमीन सरकून भूस्खलन झालेले आपण पाहिले आहे मात्र या व्हिडिओत पाण्यातून जमिन चक्क वरच्या दिशेने येताना दिसत आहे. (land came out of the water viral video in hariyana) पाण्याखाली असलेली जमिनी अचानक वर येताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेय. हा व्हिडिओ आहे हरियाणा येथील. सध्या सोशल मीडियावर अनेकदा हा व्हिडिओ पाहिला जातोय. नक्की हा काय प्रकार आहे, जमीन अशाप्रकारे वर कशी असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र याचे उत्तर अद्याप समोर आलेले नाही.

 

- Advertisement -

हरियाणामध्ये देखील सध्या चांगलाच पाऊस सुरु आहे. त्यादरम्यान ही घटना घडली आहे. व्हिडिओ पाहून अनेक लोक तिथे उपस्थित असल्याचे लक्षात येत आहे. अनेक जण जमीन वर आल्याचे पाहून मोठ्याने ओरडाना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट केल्यात. असे का झाले असेल यावर अनेक तर्क लावण्यात आलेत.

- Advertisement -

हा व्हिडिओ सोशल मीडियावर आतापर्यंत ६.१ लाख लोकांनी पाहिलाय. तर ६१ हजारांहून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून काळजी व्यक्त केलीय. तर अनेकांना हा व्हिडिओ एडिट केल्याचे म्हटले आहे. नक्की काय झाले आहे याबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही.


हेही वाचा – Photo: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय

- Advertisement -