घरट्रेंडिंगसिंहाच्या गोंडस पिल्लाने जन्मताच दिली गर्जना, पहा व्हायरल व्हिडीओ

सिंहाच्या गोंडस पिल्लाने जन्मताच दिली गर्जना, पहा व्हायरल व्हिडीओ

Subscribe

सिंहाच्या गोंडस पिल्लाने पहिल्यांदाच गर्जना देण्याचा प्रयत्न केला आहे ज्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओ चांगलेच पसंत केले जातात. सिंह, वाघाच्या शिकारचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतीलच. पण आपण सिंहाच्या लहानशा पिल्लाला जन्मताच पहिल्यांदा गर्जना देताना पाहिले आहे का? लायन किंग या चित्रपटातील सिंबाची पहिली गर्जना तुम्ही ऐकली असेलच. परंतु यावेळी सेरेनगेटी नॅशनल पार्कमध्ये (Serengeti National Park) सिंहाच्या गोंडस पिल्लाने पहिल्यांदाच गर्जना देण्याचा प्रयत्न केला आहे ज्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

असा आहे व्हिडीओ

सिंहाचं पिल्लू फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला असता काही अंतर चालूनही, तो गर्जना देण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही काळजीपूर्वक व्हिडीओ ऐकल्यास एक छोटा आवाज ऐकू येईल. गोंडस पिल्लूमुळे हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा नक्कीच होईल. हा व्हिडिओ वेलकम टू नेचर या नावाच्या ट्विटर पेजने शेअर केला आहे.

- Advertisement -

हा व्हिडिओ २६ एप्रिल रोजी शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ९० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, ९ हजाराहून अधिक लाईक्स आणि १.८ हजार वेळा रीट्वीट देखील करण्यात आला आहे. यावर लोकांनी ट्विटरवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत ….

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -