घरट्रेंडिंगभाजपच्या रणांगणात महाविकास आघाडीचा हल्ला; ट्विटरवर भाजप ट्रोल

भाजपच्या रणांगणात महाविकास आघाडीचा हल्ला; ट्विटरवर भाजप ट्रोल

Subscribe

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप करत महाराष्ट्र भाजपने आज (शुक्रावारी) ‘माझे अंगण, माझे रणांगण’ या आंदोलनाची हाक दिली. भाजप कार्यकर्ते आज आपापल्या अंगणातून विविध मार्गाद्वारे राज्य सरकारचा निषेध करणार आहेत. मात्र भाजपच्या आंदोलनादिवशीच महाविकास आघाडीकडून भाजपवरच हल्लाबोल करण्यात येत आहे. तीनही पक्षांनी एकत्र येऊन ट्विटरवर #महाराष्ट्रद्रोहीBJP असा हॅशटॅग ट्रेंड करुन त्यावर भाजपला ट्रोल केले जात आहे. देशभरात सध्या हा हॅशटॅग ट्रेंड होत असून तो सध्यातरी दहाव्या क्रमांकावर आहे. आजवर ट्विटर हे भाजपचे रणांगण समजले जात होते, मात्र महाविकाश आघाडीच्या पक्षांनी आता त्यावर स्वतःची पकड मिळवली आहे.

maha vikas aghadi campaign
#महाराष्ट्रद्रोहीBJP हा हॅशटॅग ट्रेंड होतोय

लॉकडाऊन असल्यामुळे सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे काटोकोर पालन करायचे आहे आणि त्यातही राज्य सरकारच्या विरोधात आवाज उठवायचा असल्यामुळे भाजपने या अनोख्या आंदोलनाचा मार्ग निवडला. महाराष्ट्र भाजपचे कार्यकर्ते आपल्या घराच्या प्रागंणात, गॅलरीत येऊन हातात काळे झेंडे, तोंडाला काळा मास्क लावून, काळी ओढणी किंवा काळे कपडे परिधान करुन निषेध आंदोलन करणार असे ठरले होते. त्याप्रमाणे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु देखील झाले. सोशल मीडियावर भाजपने #MaharashtraBachao असा हॅशटॅघ घेतला. मात्र ट्विटरवर आंदोलनाचा जोर पकडता आला नाही. तिथे महाविकास आघाडीच्या पक्षांनी त्यांना टेकओव्हर केले.

- Advertisement -

भाजपने आपल्या आंदोलनाची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीकडून सोशल मीडियावर भाजपविरोधात आघाडी उघडण्याचे ठरले. त्यासाठी काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख अभिजीत सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमख आदिती नलावडे आणि शिवसेनेकडून वरुण सरदेसाई यांनी या ट्रेंडचे नियोजन केले. ट्रेडिंगसाठी सर्व मालमसाला गोळ्या करण्यापासून ते तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांची एकजूट करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याची फलनिश्चिती म्हणजे महाविकास आघाडीचा हा ट्रेंड देशभर ट्रेडिंग होत आहे.

- Advertisement -

२०१४ पासून सोशल मीडिया म्हटलं की त्यावर भाजपचाच बोलबोला असायचा. राष्ट्रीय पातळीवर आप किंवा काँग्रेस भाजपला अधूनमधून टक्कर देत असत. पण एखाद्या राज्यातून संघटितपणे भाजपविरोधात खूप कमी वेळा असा ट्रेंड झालेला आहे. सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीची सोशल मीडियावर एकजूट दिसतेय तर विरोधात गेल्यानंतर भाजपची सोशल मीडियावरील पकड ढिली झाले असल्याचे यातून दिसून येते.

महाविकास आघाडीच्या काही ट्विट्सची झलक – 

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -