Maharashtra Assembly Election 2024
घरट्रेंडिंगMaharashtra Election Result 2024 : पालघरमधून शिट्टी गायब; ठाकूर पितापुत्रांचा पराभव

Maharashtra Election Result 2024 : पालघरमधून शिट्टी गायब; ठाकूर पितापुत्रांचा पराभव

Subscribe

पालघर मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे सुपूत्र क्षितीज ठाकूर यांचा पराभव झाल्यामुळे आता पालघरमधून शिट्टी गायब झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

पालघर : पालघर जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा जागांपैकी पाच जागा या महायुतीने जिंकून आपले वर्चस्व नव्याने निर्माण केल्याचे दिसून आले आहे. पालघरमध्ये यंदा भाजपा, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. वसईमधून भाजपाकडून स्नेहा पंडित तसेच काँग्रेसचे विजय पाटील आणि बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर हे यंदा निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र आता वसई विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर याचा पराभव झाल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे नालासोपाऱ्यामध्ये भाजपाचे राजन नाईक विजयी झाले असून हितेंद्र ठाकूर यांचे सुपूत्र क्षितीज ठाकूर यांचा पराभव झाला आहे. पालघर मतदारसंघात हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांचा पराभव झाल्यामुळे आता पालघरमधून शिट्टी गायब झाल्याचे दिसून येत आहे. (Sneha Dubey Pandit wins in vidhansabha assembly election.)

हेही वाचा : Maharashtra Election Result 2024 : मुंबईतील धक्कादायक निकाल, दिग्गजांना मतदारांनी बसवले घरी

- Advertisement -

बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर हे 3153 मतांनी पराभूत झाले असून भाजपाच्या स्नेहा पंडित यांना एकूण 77553 मते मिळाली आहेत. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांना आपल्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. सलग दुसऱ्यांदा हितेंद्र ठाकूर हे या मतदारसंघात विजयी झाले होते. त्यामुळे यंदा ते हॅट्रिक करणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र असे न घडता याचदरम्यान भाजपाच्या स्नेहा पंडित यांना 77553 मते मिळाली असून त्यांचा विजय झाला आहे. तर हितेंद्र ठाकूर दुसऱ्या आणि विजय पाटील तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

हेही वाचा : Maharashtra Election Result 2024 : एक है तो सेफ नारा जनतेने यशस्वी केला; फडणवीसांचे वक्तव्य

- Advertisement -

वसईमधून भाजपाच्या स्नेहा पंडीत यांना एकूण 77553 मते मिळाली आहेत. तर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर हे 3153 मतांनी पराभूत झाले आहेत. नालासोपाऱ्यात भाजपाचे राजन नाईक यांना 165113 मते मिळाली तर क्षितीज ठाकूर एकूण 36875 मतांनी पराभूत झाले आहेत. पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र गावित यांना एकूण 112894 मते मिळाली आहेत. तसेच त्यांच्या समोर उबाठा गटाचे जयेंद्र दुबे हे पराभूत झाले आहेत. तर बोईसरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विलास तरे यांना 126117 मते मिळाली आहेत. तर त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांचा दारूण पराभव झाला आहे. डहाणूमध्ये कम्युनिस्ट पार्टी इंडिया पक्षाचे विनोद निकोले यांना 104702 मते मिळाली असून त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे सुरेश मेधा यांचा 5133 मतांनी पराभव झाला आहे. तर विक्रमगडमधून भाजपाचे हरिश्चंद्र भोये यांना 114514 मते मिळाली आहेत. तसेच त्यांच्या समोर शरद पवार गटाचे सुनील भुसारा यांचा पराभव झाला आहे.

हेही वाचा : Maharashtra Election Result : भरत गोगावलेंचा विजयी चौकार, महाड विधानसभा मतदारसंघाचा रेकॉर्ड मोडला

आता हितेंद्र ठाकूर यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्याचे समोर आले आहे. तसेच या निवडणुकीमध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांची शिट्टी वाजली नाही असे म्हणता येईल. पालघर जिल्ह्यात या पूर्वीपासून बहुजन विकास आघाडीचे साम्राज्य होते. सहापैकी तीन आमदार बहुजन विकास आघाडीचे होते. एका जागेवर कम्युनिस्ट पार्टी इंडिया पक्षाचे आमदार विनोद निकोले निवडून आले होते. एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सुनील भुसारा आमदार होते, तर एका जागेवर शिवसेनेच्या शिंदे गटाचे श्रीनिवास वनगा हे आमदार होते. या पार्श्वभूमीवर या वेळी झालेल्या निवडणुकीत पालघर जिल्हा हा राज्याच्या चर्चेचा केंद्रबिंदू झाला होता. तसेच यंदा बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर तसेच त्यांचे सुपूत्र क्षितीज ठाकूर या पितापुत्रांचा पराभव झाल्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यात शिट्टी वाजली नाही हेच खरं.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -