बिहारच्या शाळेत ‘जॉनी जॉनी येस पापा’चे मैथिली भाषेतील व्हर्जन; व्हिडीओ व्हायरल

अलीकडे सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वारंवार विविध व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान, नुकताच एक जबरदस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहिल्यावर तुम्हालाही तुमच्या शाळेची आठवण नक्कीच येईल.

आपण सर्वांनीच आपल्या शाळेत असताना ‘जॉनी जॉनी यस पापा’ ही कविता नक्कीच ऐकली आहे. मात्र ही इंग्रजी भाषेतील कविता तुम्ही कधी मायबोली भाषेत ऐकली आहे का? खरंतर या व्हिडीओमध्ये बिहारमधील एका प्राथमिक शाळेमध्ये ‘जॉनी जॉनी यस पापा’ या इंग्रजी कवितेचा मैथिली भाषेत बोलताना दिसत आहे. शाळेतील शिक्षिका मैथिली भाषेमध्ये मुलांना जॉनी जॉनी यस पापा’ ही कविता शिकवत आहे आणि मुलं देखील आनंदाने ही कविता शिकत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये शिक्षिकेची अनोखी पद्धतीचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. यात ती विद्यार्थ्यांना ‘जॉनी जॉनी यस पापा’ ही कविता मैथिली भाषेत बोलताना दिसत आहे. मैथिली भाषा म्हणजे बिहारी आणि भोजपुरी भाषेचे मिश्रण आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायर होत आहे.


हेही वाचा :

Viral Video : ट्रेनच्या छतावरून प्रवाशांचा प्रवास; पण एकट्या वृद्ध व्यक्तीवरच सर्वांची नजर