Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग हौसेला मोल नाही! २ महिन्याच्या चिमुरड्यासाठी थेट चंद्रावर घेतली जमीन

हौसेला मोल नाही! २ महिन्याच्या चिमुरड्यासाठी थेट चंद्रावर घेतली जमीन

Related Story

- Advertisement -

प्रत्येकाला कोणती नं कोणती विशेष आवड असते. ही आवड जोपासण्यासाठी प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने प्रयत्न देखील करत असतो. मात्र सध्या सोशल मीडिया दोन महिन्याच्या मुलासाठी चंद्रावर जमीन विकत घेतल्याची चांगलीच चर्चा रंगतेय. चंद्र आणि चंद्राच्या प्रत्येक गोष्टींचं प्रत्येकालाच कुतूहल असतं. जमीन खरेदी करणं तसं पाहिलं तर काही विशेष बाब नाही. मात्र म्हणतात ना हौशेला मोल नाही… तसाच काहीसा प्रकार सध्या चर्चेत आहे. एका हौशी व्यक्तीने थेट चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. हा व्यक्ती गुजरातच्या सूरतमध्ये राहणारा असून तो व्यापारी असल्याचे सांगितले जात आहे. त्याने आपल्या दोन महिन्याच्या मुलासाठी चंद्रावर जमीन विकत घेतली आहे.

असा आहे घटना

मिळालेल्या माहितीनुसार, सूरतचा व्यापारी असणारा विजयभाई कथीरिया या व्यक्तीनी आपल्या दोन महिन्याच्या नित्या मुलासाठी चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. यासाठी त्यांनी न्यूयॉर्कमधील इंटरनॅशनल लूनर रजिस्ट्रीमध्ये एक मेल पाठवला. यावर त्यांना १३ मार्चला अॅप्रूवल देखील मिळालं. यानंतर त्यांनी आपले सर्व गरजेचे कागदपत्रही तिथे पाठवले. यानंतर त्यांच्या कुटुंबाला मुलाच्या नावाच्या कंपनीकडून एक प्रमाणपत्रही देण्यात आलं. त्यांना चंद्राच्या दुसर्‍या बाजूला जमीन देण्यात आली असून त्या जागेचं नाव मेर मॉस्कोव्हियन्स असं या ठिकाणाचं नाव आहे.

- Advertisement -

जमीन खरेदीच्या किंमतीचा अहवालात खुलासा नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, भारतीय चलनानुसार जवळपास ५४ हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. चंद्रावर जमीन घेणारे विजयभाई सूरतचे पहिले व्यापारी ठरले असल्याने त्यांचे सुरतमध्ये कौतुक केले जात आहे.

- Advertisement -