घरट्रेंडिंगवाहतूक पोलिसाला दोन किलोमीटरपर्यंत नेलं फरफटत; वाहनचालक फरार

वाहतूक पोलिसाला दोन किलोमीटरपर्यंत नेलं फरफटत; वाहनचालक फरार

Subscribe

अनेकजण वाहतुकीच्या नियमांपासून वाचण्यासाठी विविध प्रयत्न करत असतात. मात्र एका व्यक्तीने चक्क पोलिसांच्या जीवाशी खेळ केल्याचे एका व्हिडिओत दिसत आहे. वाहतूकीच्या पोलिसांकडून कागदपत्राची तपासणी सुरू असताना,एक व्यक्ती तेथुन पळ काढून निघून जात होता. निघून जात असताना त्याला अडवण्यासाठी पोलिस कॉन्सटेबलने त्याच्या गाडीच्या बोनेटवर चढून त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ मागील वर्षीचा असून आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

 

या घटनेत जखमी झालेल्या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव सुनिल असून ही घटना बाह्य दिल्लीच्या नांगलोई भागात घडली आहे. दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस नांगलोई भागात वाहतुकीच्या कागदपत्रांची  तपासणी करत होते. त्यावेळी आरोपी विरूद्ध दिशेने गाडीचा वेग कमी करत तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी थांबण्याचा इशारा करूनही तो थांबला नाही, म्हणून वाहनचालकास थांबवण्यासाठी कॉन्स्टेबल सुनिलने गाडीच्या बोनेटवर उडी मारली.

- Advertisement -

 

धक्कादायक म्हणजे, वाहनचालकाने गाडी थांबवण्याऐवजी त्याने गाडी वेगाने पळवली, सुमारे २ किलोमीटर पर्यंत पोलिस कॉंन्स्टेबलला खेचत घेऊन गेला. कारमधील सह प्रवाशाने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉड केला असून, अनेक वेळा विनंती नंतर त्याने पोलिस कॉन्स्टेबलला खाली उतरवले आणि तो आरोपी मात्र पळून गेला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. तर ट्विटरवरून अनेकांनी पोलिसांच्या निष्ठेबाबत कौतुक केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -