निरोगी राहण्यासाठी दिवसातून ७ वेळा करतो मुत्रप्राशन; नाक-कान-डोळ्यांनाही लावतो मुत्र

Man drinks 7 pints of his urine a day, ingests it through eyes, nose and ears
निरोगी राहण्यासाठी दिवसातून ७ वेळा करतो मुत्रप्राशन; नाक-कान-डोळ्यांनाही लावतो मुत्र

निरोगी राहण्यासाठी एक असा माणूस जो दिवसातून सात वेळा स्वतःचे मुत्रप्राशन करतो. हे मुत्रप्राशन तो तोंडासह डोळ्याच्या, नाकाच्या आणि कानाच्या माध्यमातून देखील करतो. यामुळे तो आजारी पडत नसल्याचा दावा त्याने केला आहे. हा माणूस जर्मनीतील हाम्बुर्ग येथील २६ वर्षांचा जॅन शॉनमॅनन असून तो क्रिडा प्रशिक्षक आणि विद्यार्थी आहे. स्वतःचे मुत्रप्राशन केल्याने त्याला नैराश्याला तोंड देण्यासही मदत झाली असल्याचे जॅनने सांगितले आहे.

तो २०१७ ला मुत्र थेरपी किंवा शिबंबू कल्प यात आला होता. तो तीन ते सात पिन दरम्यान स्वतःचे मुत्रप्राशन करतो. तो कानाद्वारे आणि डोळ्याद्वारे मुत्रप्राशन करण्यासाठी डोळ्याच्या काचेच्या साहाय्याने करतो. तसेच सिरिंजचा वापर देखील मुत्रप्राशनसाठी करतो. तो आपले मुत्र शरीराला देखील लावतो. शरीर हे स्वावलंबी आहे आणि मुत्रप्राशन केल्याने ते बरे होऊ शकते, असा मुत्र थेरपी दावा करते.

डेली मेलच्या वृत्तानुसार, जॅन म्हणाला की, ‘मला इंटनेटवरून शिवंबू कल्प (मुत्र थेरपी) सापडली. याबाबत मी खुल्या विचारांचा होतो. यामुळे मी हा नुकताच प्रयत्न केला. याचे लगचेच फायदे जाणवू लागले ते आश्चर्यकारक वाटले. मला माहिती होत की ही थेरपी मी पुढे चालू ठेवेन.’

पुढे तो म्हणाला की, ‘ही थेरपी त्याला निरोगी ठेवते आणि अधिक ऊर्जा देते. त्याला रात्रीची फक्त चार ते सात तासांची झोप आवश्यक आहे. ही थेरपी सर्व रोगावर आणि विषाणूंकरिता योग्य औषध आहे. मुत्र थेरपी शरीराचे स्वतःचे लसीकरण आहे. या थेरपीमुळे त्याला स्वतःच्या जाणीवेमध्ये खोलवर जाण्यास मदत केली. यामुळे मनातील सर्व कोने, वास्तविकतेच्या सखोर थर, भ्रामक कायदे, योग परंपरा, आत्मनिर्भर शरीर आणि स्वयं-उपचार यामुळे मानवी पात्रातल्या कल्पनांचा शोध घेण्यास मदत झाली.’

या थेरपीचे अनुभव त्याने इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर शेअर केले आहेत.


हेही वाचा – भारतात पुन्हा घुसखोरी करणार Tik-Tok! ‘या’ दोन कंपन्यांशी चर्चा सुरू