घरट्रेंडिंगहॉटेलचं बिल २८०० आणि वेटरला टीप दिली १२ लाख रुपये

हॉटेलचं बिल २८०० आणि वेटरला टीप दिली १२ लाख रुपये

Subscribe

कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे देशासह जगभरातील अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाले आहे. याचा सर्वाधिक परिणाम हॉस्पिटॅलिटी उद्योग क्षेत्राला बसला. वाढत्या कोरोना संसर्गामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. परिणामी हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली. यामुळे न्यू हॅम्पशायरमधील एका रेस्टॉरंटमध्ये आलेल्या एका व्यक्तीने हॉटेलला तब्बल १६,००० डॉलरची टीप देण्याचे ठरविले आहे. या व्यक्तीच्या निर्णयाचे आता सोशल मीडियावरील नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. न्यू हॅम्पशायरच्या लंडनडेरीमधील रेस्टॉरंट स्टंबल इन बार अँड ग्रिलच्या मालकाने सोमवारी फेसबुकवर यासंदर्भातील बिलाचा फोटो शेअर केल्याने या घटनेची माहिती सर्वांना समजली.

या पोस्टमध्ये रेस्टॉरंटचे मालक मायकेल जरेला यांनी रेस्टरंटमधून जेवून एवढी मोठी टीप दिलेल्या ग्राहकाच्या उदारपणाबद्दल आभार मानले. हा फोटो शेअर करत जरेला यांनी लिहिले की, “स्टंबल इनमध्ये एक अतिशय उदार ग्राहक आला होता. आम्ही त्याच्या उदारपणाबद्दल आभार व्यक्त करतो. या ग्राहकाच्या रेस्टॉरंट बिलवरून समजते की, त्याने डिनर झाल्यानंतर रेस्टॉरंटचे बिल भरत तब्बल १६,००० डॉलरची टीप दिली आहे. जी ११ लाखांहून अधिक आहे.

- Advertisement -

यावर जरेला यांनी सांगितले की, १२ जूनला मी जेव्हा पहिल्यांदा बिले पाहिले, तेव्हा मला वाटले हे चुकून झाले असेल. परंतु नंतर समजले या ग्राहकाला निनावी राहायचे असेल. यावर जरेला पुढे सांगतात, बिल भरण्याआधी हा ग्राहक नियमित रेस्टॉरंटमध्ये जेवणारा वाटत होते. या ग्राहकाने एक बिअर आणि दोन चिली चीज डॉग्सची ऑर्डर केली. त्यानंतर लोणच्याची चिप्स आणि एक (टकिला)पेग ऑर्डर केले. यानंतर साडेतीनच्या सुमारास त्याने बारटेंडरला बिलची विचारणा केली. आणि बिल पे करत टीप देत सांगितले की सर्व काही एका ठिकाणी खर्च करु नका.

बारटेंडरने हे बिल लगेच पाहिले नाही. परंतु त्या ग्राहकाने एकाच ठिकाणी सर्व पैसे खर्च करून नका असे सांगितले तेव्हा बोलण्यात काहीतरी वेगळे वाटले. यावेळी रक्कम पाहून बारटेंडरने त्या ग्राहकाला विचारले की, तुम्ही विनोद करत आहे का? यावर, तो ग्राहक सांगितो की, माझी इच्छा आहे की तुमच्याकडे हे असावे. यावर जरेला पुढे सांगतात की, या सर्वप्रकारानंतर हा ग्राहक अनेक वेळा रेस्टॉरंटमध्ये आला होता. अशाच एका प्रसंगी रेस्टॉरंटच्या मालकाची त्या ग्राहकाशी भेट घडली. यावेळी जरेला त्या ग्राहकाला म्हणाले, आम्ही या पैशामुळे गेली अनेक दिवस अस्वस्थ होतो. यावर तो ग्राहक म्हणाला, माझी इच्छा होती हे पैसे द्यावे अशी.

- Advertisement -

परंतु टीप म्हणून मिळालेल्या पैशांचे पुढे काय झाले ? य़ावर रेस्टॉरंटचे मालक जरेला सांगतात, हे टीप म्हणून मिळालेले पैसे मी आठ बारटेंडरमध्ये वाटले. जे आउटलेटमध्ये सर्वर करताना मिळणाऱ्या पैशापेक्षाही अधिक होते.
या टीपमधील पैशांचा एक भाग रेस्टॉरंटच्या किचनमध्ये काम करणाऱ्या कामगारांना वाटण्यात आला. दरम्यान यासंबंधीत जरेला यांच्या फेसबुक पोस्टवर अनेक युजर्सनी डिनर करुन गेलेल्या ग्राहकांच्या दयाळूपणाचे कौतुक केले.


लस घेण्यासाठी निघाला आणि घाबरून झाडावर चढला


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -