नोएडामध्ये महिंद्रा थार गाडी चालवताना जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या एका तरुणाला उत्तर प्रदेश पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी संबंधित तरुणाचा गाडी चालवताना स्टंटबाजी करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. पोलिसांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसतेय की, तरुण त्याच्या कारच्या खिडकीबाहेर बेसबॉलची बॅट धरून आहे. एका हातात बॅट आणि दुसऱ्या हाताने तो गाडीचे स्टेरिंग धरून गाडी चालवतोय. दरम्यान या घटनेचा व्हिडी आता सोशल मीडियावर तुफाना व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी देखील या घटनेनंतर संबंधित वाहन चालकाला ताब्यात घेतले असून त्याला नोएडा सेक्टर 24 पोलिस ठाण्यात नेले.
व्हिडीओच्या शेवटी संबंधित तरुण तुरुंगात दिसत असून तो आपल्या चुकीबद्दल माफी मागतोय. तसेच तो पुन्हा असे स्टंट करणार नसल्याचेही या तरुणाने सांगितले. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना यूपी पोलिसांनी हिंदीमध्ये लिहिले की, “जर तुम्ही रस्त्यावर स्टंट केले तर आम्ही तुम्हाला अटक करु. तसेच तुमचे वाहन जप्त केले जाईल, तुम्ही लॉकअपमध्ये असाल.”
करोगे सड़क पे स्टंट तो हम करेंगे हंट।
गाड़ी होगी ज़ब्त होगे हवालात में शंट।#RoadSafety #DriveResponsibly pic.twitter.com/hC5viffIx3— UP POLICE (@Uppolice) May 29, 2022
तरुणांविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल सोशल मीडियावरून उत्तर प्रदेश पोलिसांचे कौतुक होत आहे. एका युजरने लिहिले की, “#Noida च्या रस्त्यावर दबंग राहण्याची ही योग्य वेळ नाही. बाकी काही नाही तर #noidapolice तुम्हाला नक्कीच धडा शिकवतील.