Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग बापरे! कचरा फेकायला गेला आणि स्वत:च घंटागाडीत पडला!

बापरे! कचरा फेकायला गेला आणि स्वत:च घंटागाडीत पडला!

व्हायरल व्हिडिओ बघून तुम्ही देखील थक्क व्हाल हे नक्की!

Related Story

- Advertisement -

सोशल मीडिया असं एक माध्यम आहे, ज्याद्वारे कोणताही फोटो किंवा मॅसेज अवघ्या काही क्षणात जगभर पसरतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. जो बघून तुम्ही देखील थक्क व्हाल! लहान- मोठ्या शहरांमध्ये बहुतेक ठिकाणी प्रत्येक गल्लीत कचरावाला किंवा घंटागाडी येत असते. मात्र घराखाली किंवा दारात कचरा फेकण्याची सोय असली तरी देखील लोक कचरा टाकायला बिल्डींग खाली जाण्यास टाळाटाळ करतात.. तर काही नमुने असेही असतात की ते घंटागाडी आली हे बघताच आपल्या घराच्या खिडकीतून थेट कचऱ्याची पिशवी भिरकवतात. अशा लोकांना म्हणायचे तरी काय… अशा लोकांसाठी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. त्यावरून लक्षात येऊ शकते की एखाद्या व्यक्तीला त्याच्या आळशीपणा किती नडू शकतो.

आयपीएस अधिकारी दिपांशू काब्रा यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्या व्हिडिओला ‘कचरा फेकायचा आहे, कचऱ्यासोबत स्वतःला नाही.’ असे कॅप्शन दिले आहे. यासह त्यांनी असेही म्हटले की, रोजच्या दैनंदिन कामांमध्ये जराजरी निष्काळपणा दाखवला तरी मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे नेहमी सावध राहायला हवे. यासह कोणत्याही शॉर्टकटचा पर्याय निवडताना नेहमी सतर्क रहा, जेणेकरून होणारी दुर्घटना टळेल.

असा आहे व्हायरल होणारा व्हिडिओ

- Advertisement -

या व्हाय़रल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक माणूस त्याच्या घरातील खिडकीतूनच कचरा टाकताना दिसतो. मात्र यावेळी त्याचा तोल गेल्याने तो स्वतः उंचावरून त्या कचऱ्याच्या घंटागाडीत पडतो. मात्र सुदैव म्हणजे हा माणूस थेट सिमेंटच्या रस्त्यावर न पडता कचऱ्याच्या गाडीत पडतो त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नसल्याचे सांगितले जात आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटीझन्सनी विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहे. तर हा व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरत नसल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसून येत आहे.

- Advertisement -