आंबा की पर्स? व्हायरल व्हिडिओ पाहून लोक चक्रावले

एका माणसाने आंब्याला चैन (Zip) लावून त्याची पर्स तयार केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Video viral on social media) तुफान व्हायरल झाला असून लोक संभ्रमित झाले आहेत.

आंबा (Mango) न आवडणारा एखादाच निराळा या जगात सापडू शकतो. आंब्याची मागणी वाढल्याने सध्या आंब्याला सोन्याचा भाव प्राप्त झाला आहे. त्यामुळे ज्यांना मनसोक्त आंबे खाता येतात, त्यांना श्रीमंत संबोधलं जातं. शिवाय, आंब्याचे विविध फायदेही (Benefit of mango) असतात. सध्या आंब्याचा सीझन (Mango Season) सुरू असल्याने त्याचे वेगवेगळे फायदे सांगितले जातात. मात्र, एका माणसाने आंब्याला चैन (Zip) लावून त्याची पर्स तयार केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Video viral on social media) तुफान व्हायरल झाला असून लोक संभ्रमित झाले आहेत.

काही सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की एका माणसाने आंबा हातात धरला आहे. या आंब्याला मधून कापत तिथे चैन लावण्यात आली आहे. म्हणजेच ही चैन उघडल्यास आंब्याचा आतील भाग दिसू शकेल. हा व्हिडिओ बघून सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. कारण आंब्याची साल फार मऊ असते. ती सहज कापली जाऊ शकते. मग असं असताना या सालीला चैन कशी लावली गेली असेल?

beautiffulearth या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ६० हजारापेक्षा जास्त लाईक्स असून ३ मिलिअनपेक्षा जास्त व्ह्युज आहेत.