नवरदेव गर्लफ्रेंडबरोबर गुल, नवरीने मांडली वऱ्हाडीबरोबर चूल

एका सिनेमातील सीन सारखा वाटेल. पण हे खरं आहे. मांडवात जमलेल्या एका वऱ्हाडसोबत नवरीने आपल्या नव्या आयुष्याला सुरूवात केली.

marriage in karnataka groom runs away for wedding bride ties knot with guest
नवरदेव गर्लफ्रेंडबरोबर गुल, नवरीने मांडली वऱ्हाडीबरोबर चूल

लग्न ही सर्वाच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट असते. लग्नाचा दिवस हा सर्वांसाठी खास असतो. पण लग्नाच्या दिवशी भरमंडपात लग्न मोडले किंवा नवरा किंवा नवरी पळून गेले तर काय होईल ? अशा परिस्थितीवर मात करून पुन्हा एकदा बोहल्यावर चढलेल्या एका नवरीची चांगलीच चर्चा सुरू आहे. भरमांडवात नवरा पळून गेल्याने नवरीने मांडवात आलेल्या वऱ्हाडीबरोबर लग्न केले. एका सिनेमातील सीन वाटेल पण हे खरं आहे. मांडवात जमलेल्या एका वऱ्हाडसोबत नवरीने आपल्या नव्या आयुष्याला सुरूवात केली.

कर्नाटकातील चिकमंगलरू जिल्ह्यातील तरिकेरे गावातील ही घटना आहे. दोन्ही भावा लग्न एकाच मांडवात लागणार होते. नवीन आणि अशोक अशी या भावडांची नावे आहेत. अशोकच्या लग्नाच्या सगळ्या विधी पूर्ण झाल्या. आता नवीनचे लग्न लागणार होते. विधीला सुरूवात होण्यापूर्वी नवीन लग्नमंडपातून गायब झाला. नवीनची होणारी पत्नी सिंधू लग्न होण्याची आतुरतेने वाट बघत होती. त्याचवेळी नवीन लग्नमंडपातून गायब झाल्याने भर मंडपात एकच खळबळ उडाली. नवरा पळून गेल्याने सिंधूने न खचता तिने मांडवात जमा झालेल्या कोणाशीही लग्न करेन असे सांगितले. लग्नासाठी वऱ्हाड्यांमधील चांगला मुलगा शोधण्यास सांगितले. त्याप्रमाणे मुलीच्या परिवाराने तिचे चंद्रप्पा नावाच्या एका तरूणाशी लग्न लावून दिले. चंद्रप्पा BMTCमध्ये कंडक्टर आहे. दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने दोघांनी लग्न केले.

म्हणून नवरदेव पळाला मांडवातून

नवीनचे एका दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. घरच्यांनी विरोध केल्याने त्याने सिंधूसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. नवीन लग्न करतोय हे त्याच्या प्रेयसीला कळताच तिने नवीनला तु जर माझ्या सोबत आला नाहीस, तर मी तुझे लग्न मोडून भर लग्नमंडपात सर्वांसमोर विष पिऊन जिव देईन,अशी धमकी दिली. प्रेयसीच्या धमकीमुळे नवीन भरमंडपातून पळून गेला.


हेही वाचा – नायलॉन मांजाने कापली युवकाची मान