घरट्रेंडिंग#MeToo : आरोप करणाऱ्या महिलांनी सबळ पुरावे द्यावेत - ट्रम्प

#MeToo : आरोप करणाऱ्या महिलांनी सबळ पुरावे द्यावेत – ट्रम्प

Subscribe

महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सुरू झालेली #MeToo (मीटू) चळवळ आता मोठी होत आहे. जगभरातील विविध देशांमध्ये मीटू व्यापक होत आहे. या चळवळीमुळे महिलांवर झालेला लैंगिक अत्याचार, शोषण, छळ, गैरवर्तनाबाबत महिला बोलत आहेत. परंतु असे करत असताना आरोप करणाऱ्या महिलांनी सबळ पुरावे द्यावेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी म्हटले आहे.

मेलानिया सध्या केनिया दौऱ्यावर आहेत. येथे एका वृत्तवाहिनला त्या मुलाखत देत होत्या. या मुलाखतीदरम्यान बोलताना मेलानिया ट्रम्प म्हणाल्या, ‘मुली, महिला लैंगिक अत्याचार, शोषण, छळ यासंबंधीचे आरोप करत आहेत. या सर्व महिलांना व मुलींना आपण पाठिंबा द्यायला हवा. या सर्व महिलांना माझा पाठिंबा आहे. त्यामुळे अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे. महिलाच नाही तर पुरुषांनादेखील अनेकदा वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पुरुषांचे म्हणणेदेखील आपण ऐकूण घ्यायला हवे. त्यांनादेखील पाठिंब्याची आवश्यकता आहे.

- Advertisement -

घेतली नवऱ्याची बाजू

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही अनेकदा महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे मेलानिया यांनी त्यांच्या नवऱ्याची बाजू घेतल्याचे म्हटले जात आहे. पुरुषांनाही त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे. पुरुषांसाठी सध्याचा काळ काहीसा कठीण आहे. प्रसारमाध्यमांनाही सत्यता पडताळून पाहावी, त्यानंतरच त्यांनी बातम्या प्रकाशित कराव्यात, असा सल्लादेखील मेलानिया यांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -