घरट्रेंडिंग#MeToo - नाना पाटेकर तनुश्री दत्ता वादामध्ये सई ताम्हणकरची उडी, सई म्हणते...

#MeToo – नाना पाटेकर तनुश्री दत्ता वादामध्ये सई ताम्हणकरची उडी, सई म्हणते…

Subscribe

भारतात आता मी टू ही चळवळ जोर धरु लागली आहे. बॉलीवूडमधील विविध अभिनेत्रींनी या चळवळीच्या माध्यमातून त्यांच्यावर झालेले अत्याचार लोकांसमोर मांडले आहेत. आता काही मराठी अभिनेत्रीदेखील यावर बोलू लागल्या आहेत. निर्मात्या दिग्दर्शिका विंटा नंदा यांनी ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. त्यानंतर अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी याबाबत सोशल मीडियावर राग व्यक्त केला आहे. आता मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिनेदेखील आता या प्रकरणात उडी घेतली आहे. तिने आलोक नाथ यांच्यावर टिका केली आहे. त्यानंतर सई ताम्हणकर आलोक नाथ यांच्यावर टिका करते, परंतु नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरणावर मात्र शांत का राहिली असा सवाल तिला अनेक नेटिझन्सनी विचारला. या नेटिझन्सना उत्तर देताना सई म्हणाली की, माझ्या या प्रकरणावर व्यक्त होण्याचा इतका राग का? कारण जेव्हा एखादी व्यक्ती बलात्कार झाल्याचा आरोप करते, तेव्हा लोक बलात्कार झाल्याचे पुरावे मागतात. यावरूनच लोकांची मानसिकता दिसते. यामध्ये मराठी असण्याचा किंवा नसण्याचा प्रश्न नाही. जे चुकीचे आहे ते चुकीचे आहे. मग ती चूक करणारी व्यक्ती कोणीही असो. काही महिला या मोहिमेच्या माध्यमातून चुकीचे आरोपसुद्धा करत आहेत. सिने इंडस्ट्रीत तसेच आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय, ते पाहून मला खूप मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

काय होतं सईचं पहिलं ट्विट

आलोक नाथ यांच्यावर निर्माती विंटा नंदा यांनी बलात्काराचा आरोप केल्यानंतर सईने ट्विट केले, त्यामध्ये म्हटले होते की, तुम्ही कधीच चांगलं आणि शांततापूर्ण आयुष्य जगू शकणार नाही, तुम्ही नरकातच सडणार. असे ट्विट करत सईने मी टू मोहिमेला पाठिंबा दर्शवला. यासोबत सई म्हणाली की, तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर जे काही आरोप केले आहेत ते ऐकून मला धक्का बसला आहे. मात्र तिच्या आरोपात तथ्य असेल तर नाना पाटेकर यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -