गर्लफ्रेंडच्या आईला वाचवण्यासाठी बॉयफ्रेंडने दिली किडनी, पण नंतर गर्लफ्रेंडनं केल डिच

माझी किडनी काढून माझ्या प्रेयसीच्या आईला दिली आणि तिचा जीव वाचवण्यासाठी मदत केली. पण मला माहिती नव्हते की केलेल्या या चांगल्या कामामुळे माझे नाते संपुष्टात येईल. मी तिच्या आईला किडनी देऊन त्यांचे प्राण वाचवले आणि माझ्या प्रेयसीने महिनाभरातच मला सोडून दुसऱ्यासोबत लग्न केले.

Mexican Man donates his Kidney to Girlfriend Mother, She marries someone else a month later
किडनी दान करुन वाचवला प्रेयसीच्या आईचा जीव अन् एका महिन्यात तिने दिला प्रियकराला धोका

आजच्या बदलत्या जमान्यात भावना संपत चालल्या आहेत. खरे प्रेम आणि प्रेम करणाऱ्या माणसासोबत एकनिष्ठ राहणे हे आजकालच्या पिठीमधून कमी होत चालले आहे. त्यामुळे ब्रेक अप, घटस्फोटाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.  असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक प्रेमभंग झालेला तरुण त्यांची कहाणी सांगतोय. ज्याची कहाणी ऐकून नेटकरी देखील भावूक झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा तरुण मेक्सिकन असल्याचे सांगितले जात आहे. त्याची कहाणी खरंच प्रेमावर विश्वास करणाऱ्या सर्वांना विचार करायला भाग पाडत आहे. (Mexican Man donates his Kidney to Girlfriend Mother, She marries someone else a month later)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेक्सिकन तरुणाने त्याच्या प्रेयसीच्या आईचा जीव वाचवण्यासाठी स्वत:ची किडनी तिला दान केली. त्यानंतर एक महिन्यानंतर प्रेयसीने प्रियकराला धोका देऊन दुसऱ्यासोबत लग्न केले. सोशल मीडियावर या प्रेम कहाणीची तूफान चर्चा असून नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल केला आहे.

या व्हिडीओत आपली प्रेम कहाणी सांगणाऱ्या तरुणाचे नाव मार्टिनेज असे असून तो शिक्षक आहे. टिक टॉकवरुन त्याने त्याच्या प्रेमाची कबूली दिली होती. मात्र त्याच्यासोबत झालेल्या या धोक्याने तो आता पूर्णपणे कोलमडून गेला आहे. मार्टिनेजने त्याच्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, उदारपणे मी स्वत:च्या शरिरातील एक भाग काढून माझी किडनी काढून माझ्या प्रेयसीच्या आईला दिली आणि तिचा जीव वाचवण्यासाठी मदत केली. पण मला माहिती नव्हते की केलेल्या या चांगल्या कामामुळे माझे नाते संपुष्टात येईल. मी तिच्या आईला किडनी देऊन त्यांचे प्राण वाचवले आणि माझ्या प्रेयसीने महिनाभरातच मला सोडून दुसऱ्यासोबत लग्न केले.

डेली स्टारच्या माहितीनुसार, मार्टिनेजचा व्हिडीओ टिक टॉकवर सध्या प्रचंड व्हायरल होत असून आतापर्यंत या व्हिडीओला 14 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मार्टिनेजचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फसवणूक करणाऱ्या प्रेयसीची तक्रार दाखल करा अशा कमेंट आल्या असून मार्टिनेजने मला माझ्या प्रेयसीविषयी कोणतीही तक्रार करायची नसल्याचे त्याने सांगितले. त्याचे असे म्हणणे आहे की, माझ्याकडे तिच्या विरोधात बोलण्यासाठी काहीही नाही. आम्ही आता मित्र नाही आहोत मात्र आम्ही एक दुसऱ्याचा द्वेष करत नाही. मी फक्त टिक टॉकसाठी व्हिडीओ बनवला पण मला वाटले नव्हते की तो इतका व्हायरल होईल.


हेही वाचा –  Raima Islam: खून करुन पतीनेच पोत्यात कोंबला ‘या’ अभिनेत्रीचा मृतदेह, हरवल्याची तक्रारही दिली होती