घरटेक-वेकमायक्रोसॉफ्ट विंडोज-७ सॉफ्टवेअर बंद करणार

मायक्रोसॉफ्ट विंडोज-७ सॉफ्टवेअर बंद करणार

Subscribe

जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टने पुढल्या वर्षापासून कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टम विंडोज -७ चा मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करण्याची घोषणा केली आहे. १४ जानेवारी २०२० पासून विंडोज ७ ला सपोर्ट करणे मायक्रोसॉफ्टकडून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे विंडोज ७ चे कॉम्प्युटर आणि लॅपटॉप काम करणे बंद करणार आहेत.

मायक्रोसॉफ्टने जून २०१८ मध्ये विंडोज ७ साठीचा फोरम सपोर्ट बंद केला होता. आता आणखी एका वर्षाने म्हणजेच १४ जानेवारी २०२० नंतर मायक्रोसॉफ्ट कंपनी विंडोज -७ साठी सपोर्ट करणे बंद करणार आहे. म्हणजेच विंडोज -७ सॉफ्टवेअर असलेल्या कॉम्प्युटरमध्ये कोणतेही अपडेट मिळणार नाहीत. त्यात प्रामुख्याने सिक्युरिटी फिक्स आणि पॅचेसचा समावेश आहे. याचे अपडेट मिळाले नाहीतर कॉम्प्युटवर व्हायरसचा हल्ला होण्याची शक्यता असते. मात्र, ही सुविधा सुरू ठेवण्यासाठी पैसे भरून सेवा हा पर्याय मायक्रोसॉफ्टने खुला ठेवला आहे.

- Advertisement -

कंपनी आता विंडोज- ७ एक्स्टेंडेट सेक्युरिटी अपडेट्स विकणार आहे. इंटरप्राइजेस युजर्स या ऑपरेटिंग सिस्टमचा आधीपासून वापर करत असल्याने ते बंद करण्याची शक्यता कमी आहे. कंपनीने आता विंडोज- ७ मध्ये नवीन फीचर्स देणे बंद केले आहे. विंडोज- १० मध्ये खासगी सुधारणा करण्यात आल्या आहेत. विंडोज- १० वापरणार्‍यांची संख्या ७० कोटींहून अधिक आहे. मायक्रोसॉफ्टने ७ जुलै २००९ रोजी विंडोज- ७ आणले होते. विंडोज- ७ नंतर विंडोज- ८ त्यानंतर ८.१ आणि आता १५ जुलै २०१५ मध्ये कंपनीने विंडोज- १० आणले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -