घरट्रेंडिंगधक्कादायक! १.५ लाखात अल्पवयीन मुलीची तस्करी

धक्कादायक! १.५ लाखात अल्पवयीन मुलीची तस्करी

Subscribe

हरियाणात एका अल्पवयीन मुलीची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

देशभरात महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरलेला असताना आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हरियाणात एका अल्पवयीन मुलीची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आठवड्यापूर्वी हरियाणात एक अपल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर आढळली आहे. २९ जानेवारी रोजी पोलिसांनी या घटनेचा छडा लावत पीडितेची यापासून सुटका केली आहे. तपासादरम्यान दिड लाखाच्या बदल्यात पीडितेला खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या अल्पवयीन मुलीला एका बबली नावाच्या मानवी तस्करी करणाऱ्या व्यक्तीने १.५ लाखासाठी विकले होते. तसेच पोलिसांनी पीडितेला खरेदी करणाऱ्या राजेश जाट याला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत मुलगी गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईने गर्भपात करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

- Advertisement -

कसा लागला पीडितेचा शोध?

थाटीपुर येथील पोलिसांना २०१९ मध्ये एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याचे समजताच whatsup चा आधार घेत पीडितेचा शोध घेतला, त्यानंतर हरियाणातील पनवास गावात पोलिसांना संबंधित मुलगी चार महिन्याची गरोदर असल्याचे आढळले. अल्पवयीन मुलीला राजेश जाट नावाच्या व्यक्तीने १.५ लाखांच्या बदल्यात खरेदी करून तिच्याशी विवाह केल्याचे उघडकीस आले.

दिल्लीच्या स्थानकावरून केली तस्करी

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेताच चौकशी दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार; एका तरूणाने मदत करण्याच्या अपेक्षेने बबलीकडे सुपुर्त करण्यात आले. बबलीने राज नावाच्या महिलेच्या मदतीने अल्पवयीन मुलीचा व्यवहार राजेशशी करवून दिला होता.

- Advertisement -

अल्पवयीन मुलीच्या सुटकेनंतर मुलीचे समुपदेशन करण्यात आले, त्यावेळी पीडीता गरोदर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. गुरुवारी वैद्यकिय चाचणीत मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब समोर येताच पीडितेच्या आईने न्यायालयात धाव घेतली असून, गर्भपात करण्याची याचिका दाखल केली आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -