कोरोना निदान करणारा मास्क MIT च्या संशोधकांनी केला तयार, अवघ्या ९० मिनिटात निकाल

संशोधकांनी मास्क तयार केला असून या मास्कच्या आतील बाजूला सेन्सर बसवण्यात येतो

MIT researchers have developed a mask that can diagnose corona in just 90 minutes
कोरोना निदान करणारा मास्क MIT च्या संशोधकांनी केला तयार, अवघ्या ९० मिनिटात निकाल

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. कोरोना रुग्णांची शोध घेण्यासाठी कोरोना चाचाण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी युद्धपातळीवर संशोधकही अभ्यास आणि संशोधन करत आहेत. सध्या MIT च्या संशोधकांनी कोरोनाचे निदान करणारा मास्क तयार केला आहे. या मास्कचे वैशिष्ट्ये म्हणजे अवघ्या ९० मिनिटात हा मास्क कोरोनाची लागण झाले का नाही याचं निदान करतो. या मास्कला विशिष्ठ प्रकारचा सेन्सर बसवण्यात आला आहे. तसेच हा मास्क वापरल्यानंतर फेकूही शकतो. मास्क कोरोनाचे निदान कसं करु शकतो असा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला समजणार आहे.

कसा काम करणार मास्क

मास्क कोरोनाचे निदान करणार यामुळे आश्चर्यच वाटत असेल. संशोधकांनी मास्क तयार केला असून या मास्कच्या आतील बाजूला सेन्सर बसवण्यात येतो हा सेन्सर तुम्ही कोणत्याही मास्कमध्ये सहज बसवू शकता. इतर आजारांसाठीही हा मास्क अनुकूल ठरला आहे. मास्क घातल्यावर हा सेन्सर बटनद्वारे चालू करायचा आहे. कोरोनाचं निदान झाले आहे का नाही हे सेन्सरच्या मदतीने मास्कच्या आतील बाजूलाच समजणार आहे.

मास्क वापरणाऱ्या व्यक्तीच्या तोंडावाटे आणि नाकावाटे बाहेर येणाऱ्या जंतूंशी आणि सूक्ष्म द्रवपदार्थांचा सेन्सरशी संबंध येतो आणि यामुळे ९० मिनिटात कोरोना झालाय का याचे निदान होतो असे एमआयटीच्या संशोधकांनी सांगितले आहे. या मास्कवर बऱ्याच वर्षांपासून संशोधन सुरु होते. मास्कच्या आतील बाजूला बसवण्यात येणाऱ्या स्ट्रिप्सवरील रंगात हलका बदल होतो यामुळे कोरोना झाला आहे का नाही हे मास्क वापरणार्याला समजते.

संशोधकांनी असेही म्हटलं आहे की, हे सेन्सर केवळ मास्कमध्येच नाही तर कपड्यांच्या विविध भागातही लावण्यात येऊ शकतात यामुळे कोणत्याही आजाराची किंवा संसर्गाची लागण झाल्यास त्वरित निदान होईल. आरोग्य कर्मचारी आणि परिचारिका यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठीही हे सेन्सर लावण्यात येऊ शकतात. यामुळे विवधा रोग आणि इतर आजारांपासून धोका निर्माण होणार नाही.