घरटेक-वेकमोबाईलवर बोलणे, इंटरनेट वापरणे १ एप्रिलपासून होणार महाग, टेलिकॉम कंपन्या लागल्या तयारीला

मोबाईलवर बोलणे, इंटरनेट वापरणे १ एप्रिलपासून होणार महाग, टेलिकॉम कंपन्या लागल्या तयारीला

Subscribe

टेलिकॉम कंपन्यांनी २०१९मध्ये पहिल्यांदा त्यांच्या टॅरिफमध्ये वाढ केली होती. या टॅरिफमध्ये वाढ झाल्यास ग्राहकांना २ जी सेवेमधून ४ जी अपग्रेडेशनमुळे एव्हरेड रिव्हन्यूच्या युजर्समध्ये सुधारणा होऊ शकते.

टेलिकॉम कंपन्या येत्या काळात त्यांच्या प्लॅनमध्ये मोठी बदल करण्याची शक्यता आहे. त्याच्या या बदलामुळे ग्राहकांना मोठा फटका बसण्याचीही शक्यता आहे. येत्या १ एप्रिलपासून हे टेलिकॉम कंपन्यांचे दर वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. इव्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रिडिचट रेटिंग एजन्सीने दिलेल्या रिपोर्टनुसार, महसूल वाढविण्यासाठी १ एप्रिल या आर्थिक वर्षांपासून टेलिकॉम कंपन्या त्यांच्या टॅरिफमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले आहे. मात्र याबाबत टेलिकॉम कंपन्यांकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. याआधीही टेलिकॉम कंपन्यांनी २०१९मध्ये पहिल्यांदा त्यांच्या टॅरिफमध्ये वाढ केली होती. या टॅरिफमध्ये वाढ झाल्यास ग्राहकांना २ जी सेवेमधून ४ जी अपग्रेडेशनमुळे एव्हरेड रिव्हन्यूच्या युजर्समध्ये सुधारणा होऊ शकते. वर्षांच्या मध्यापर्यंत याची किंमत २२० रुपये होऊ शकते. पुढच्या दोन वर्षात इडस्ट्रीचा रेव्हेन्यू ११ टक्क्यांहून १३ टक्क्यांनी वाढूही शकतो. २०२१ च्या आर्थिक वर्षात ऑपरेटिंग मर्जिंग जवळपास ३८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या फटका सर्वच क्षेत्रांना बसला.  मात्र टेलिकॉम कंपन्या यापासून दूर राहिल्या. टेलिकॉम कंपन्यांना याचा मोठा फटका बसला नाही. लॉकडाऊनच्या काळात डेटा युजेस आणि टॅरिफमध्ये वाढ झाल्याने परिस्थितीमध्ये सुधारणा आली. लॉकडाऊनच्या या काळात वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा, कॉलेज आणि क्लासेसाठी मोठ्या प्रमाणात डेटा वापरला गेला.

- Advertisement -

टेलिकॉम कंपन्यांच्या एडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यूत १.६९ लाख करोड रुपयांची थकबाकी आहे. आतापर्यंत फक्त १५ टेलिकॉम कंपन्यांनी ३० हजार २५४ करोड रुपयांची थकबाकी भरली आहे. एअरटेल कंपनीवर अजूनही जवळपास २५ हजार ९७६ करोड, वोडाफोन आयडिया वर ५० हजार ३९९ कोटींची थकबाकी देणे आहे. तर टाटा टेलिसर्विसवर जवळपास १६ हजार ७९८ करोड रुपयांची थकबाकी आहे.


हेही वाचा – Vivo चा बंपर धमाका, भारतात ११ नवीन स्मार्टफोन करणार लाँच

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -