घरट्रेंडिंगTeleprompter: टेलिप्रॉम्टर ट्रेडिंगला! मीमर्सच्या कल्पनाशक्तीला सलाम, मांडली मोदींची अवस्था

Teleprompter: टेलिप्रॉम्टर ट्रेडिंगला! मीमर्सच्या कल्पनाशक्तीला सलाम, मांडली मोदींची अवस्था

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (World Economic Forum (WEF)) ऑनलाईन दावोस अजेंडा २०२२ शिखर परिषदेत सहभागी झाले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत असताना टेलिप्रॉम्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि यामुळे मोदींचा गोंधळच उडाला. तसेच या तांत्रिक अडचणीमुळे पंतप्रधान मोदी यांना संबोधित करणे थांबवावे लागले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच यामुळे मीमर्सना पंतप्रधान मोदींवर निशाणा साधण्याची चांगलीच संधी मिळाली आहे. त्यामुळे सध्या सर्व सोशल मीडियावर मोदींच्या या व्हिडिओच्या मीम्सचा पाऊस पडत आहे. ट्वीटरवर #pappu आणि #TelepromterPM हे हॅशटॅग ट्रेंड करत आहे.

- Advertisement -

पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारे मीम्स?

काँग्रेसच्या सोशल मीडिया अधिकृत अकाऊंटवर पंतप्रधान मोदींचा झालेल्या गोंधळाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि रणबीर कपूरच्या चित्रपटातील गाणे लिहिले आहे. असे बरेच ट्वीट काँग्रसने केले आहेत.

१) दी रिअल पप्पू

- Advertisement -

२) टेलिप्रॉम्टरची वायर मी काढली….

३) टेलिप्रॉम्टर असताना आणि टेलिप्रॉम्टर नसताना..

४) टेलिप्रॉम्टर नसताना आणि असतानाची पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची अवस्था

५) ‘आजपासून तुम्ही मोदी नाही तर पप्पू आहात’

६) खतम..बाय बाय..टाटा!!!! गूड बाय….गया…!!!

नक्की काय घडले?

भारतीयांनी कोरोना महामारी विरोधातील लढा कसा दिला, याबाबत सांगताना भारतीयांची इच्छाशक्ती चांगली आहे, असे मोदी म्हणाले. मात्र त्यानंतर टेलिप्रॉम्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि तो बंदच पडला. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण देता देता थांबले. टेलिप्रॉम्टरमधील झालेल्या बिघाडामुळे त्यांचा गोंधळ उडाला आणि संतापलेल्या हावभावात स्क्रीनच्या उजव्या बाजूला पाहू लागले. त्यानंतर त्यांनी कानात हेडफोन लावला आणि झालेल्या गोंधळानंतर समोरच्या उपस्थितीत असलेल्यांना ऐकू येतय का असे मोदी विचारू लागले.


हेही वाचा – पीएम मोदींच्या भाषणात अडथळा, टेलिप्रॉम्प्टरलाही खोटं सहन झालं नाही ; राहुल गांधींची मोदींवर टीका


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -