Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ट्रेंडिंग पित्याचं नाव 'मध्यप्रदेश' तर मुलाचे नाव 'भोपाळ'!

पित्याचं नाव ‘मध्यप्रदेश’ तर मुलाचे नाव ‘भोपाळ’!

मध्यप्रदेश यांच्या नावामुळे ते गावात खूप प्रसिद्ध आहेत. मात्र या नावामुळे अनेक लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो.

Related Story

- Advertisement -

आपण एखाद्या मुलीचे नाव मुलाला किंवा मुलाचे नाव मुलीला ठेवलेले ऐकलं आहे. मात्र तुम्ही कधी राज्याची नाव असलेली व्यक्ती पाहिले आहेत. मनावर तालुक्यातील भमोरी खेड्यातील रहिवासीचे नाव मध्यप्रदेश असून मुलाचे नाव ‘भोपाळ’ आहे. मध्यप्रदेश सिंह यांच्या वडिलांनी त्यांचे नाव ठेवले होते. ज्यावेळी ‘मध्यप्रदेश’ दहावीला गेले त्यावेळेस त्यांनी ठरवलं होतं की, जेव्हा त्यांना मुलगा होईल तेव्हा त्याचे नाव ते भोपाळ ठेवतील. त्यानंतर त्यांनी हा अट्टाहास पूर्ण केला आणि मुलाचे नाव भोपाळ ठेवले.

मध्यप्रदेश सिंह यांच्या अनोख्या नावामुळे ते गावामध्ये खूप प्रसिद्ध आहे. ही एकमेव अशी व्यक्ती आहे की, ज्यांचे नाव ऐकून लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या मध्यप्रदेश झाबुओ चंद्रशेखर आझाद शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मध्यप्रदेश यांनी असं सांगितलं की, ‘नऊ भावंडांमध्ये मी सर्वात मोठा आहे. माझे नाव हे आमच्या कुटुंबातील मोठ्या लोकांनी ठेवले आहे. कुटुंबाने माझे हे नाव ठेवल्याचा मला खूप अभिमान वाटतो. ५ सप्टेंबर १९८५ साली शिक्षक दिन दिवशी माझा जन्म झाला.’

- Advertisement -

कॉलेज पूर्ण झाल्यानंतर मध्यप्रदेश याचा विवाह झाला. मध्यप्रदेशाच्या पत्नीने असं सांगितलं की, ‘कॉलेजमध्ये असताना मी जेव्हा मध्यप्रदेश यांचं नाव ऐकलं तेव्हा मला विचित्र वाटलं. परंतु ओळख झाल्यानंतर आमची मैत्री झाली आणि आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न झाल्यानंतर आम्ही खूप सुखी आणि आनंदी आहोत.’


हेही वाचा यंदा दिवाळीत चिनी वस्तूंच्या विक्रीत ६० टक्क्यांनी घट


- Advertisement -

 

- Advertisement -