घरट्रेंडिंगनातवांच्या शिक्षणासाठी रिक्षाचालक आजोबांनी विकले राहते घर

नातवांच्या शिक्षणासाठी रिक्षाचालक आजोबांनी विकले राहते घर

Subscribe

वयस्कर रिक्षाचालक आजोबा देसराज यांची संघर्षमय प्रवास, अनेकांना मदतीचे आवाहन

प्रत्येक आई बापाचे एक स्वप्न असते की आपला मुलगा किंवा मुलगी खूप शिक्षण घेऊन मोठा झाला पाहिजे. त्यासाठी आईवडील रात्रंदिवस काबाड कष्ट करतात. परंतु कर्त्या मुलांच्या मृत्यूनंतर एक वयस्कर रिक्षाचालक आजोबांची आपल्या नातवाड्यांच्या जबाबदाऱ्या घेतल्या आहे. या नातवांच्या शिक्षणासाठी आजोबा दिवसरात्र मेहनत घेत आहे. मुंबईच्या रस्त्यावर रात्रंदिवस रिक्षा चालवत नातवांच्या शिक्षणाचा खर्च उचलत आहे. एवढेच नाही तर नातावाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपले राहते घरही विकले. देसराज यांच्या संघर्षमय कहाणी सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

देसराज यांनी पोटच्या दोन मुलांना गमावल्यामुळे पूर्ण घराची जबाबदारी म्हातारपणातही त्यांच्यावर आली. एका मुलाखतीत आपली संघर्षमय कहाणी सांगताना रिक्षाचालक आजोबा देसराज खूप भावुक झाले होते. या मुलाखतीमधील देसराज यांचा संघर्ष पाहता अनेकांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. या संघर्षाविषयी देसराज सांगतात, ६ वर्षापूर्वी माझा एक मुलगा बेपत्ता झाला. कामासाठी म्हणून तो बाहेर गेला तो पून्हा घरी परतलाच नाही. त्यानंतर एका आठवड्यातच त्याच्या निधानाची बातमी आली. कमावला मुलगा गमावल्याने अश्रू आवरणे कठीण झाले होते. मुलगा गमावल्याने घरच्या जबाबदाऱ्या देसराज यांच्या खांद्यावर आल्या. त्यामुळे जबाबदाऱ्यांचे ओझे घेऊन देसराज त्यांनी रिक्षा चालण्याचा निर्णय घेतला. यानंतरच दोन वर्षानीच दुसऱ्या मुलाने आत्महत्या केली. त्यामुळे दोन मुलांच्या बायका आणि ४ नातवंडांच्या पालन पोषणा देसराज यांना करावे लागले. यावेळी ९ वीत शिकणाऱ्या त्यांच्या नातीने एकट्या आजोबांवरील घराच्या जबाबदारीचे ओझे पाहता पैशासाठी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु देसराज यांनी तिला तसे करु दिले नाही. देसराज नातवांच्या शिक्षणासाठी दिवस रात्र काम करत राहिले. देसराज मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाविषयी सांगतात, मुलांच्या शिक्षणासाठी ६ हजार रुपये खर्च होतात. तर बाकी ४ हजार कुटुंबातील सात जणांच्या जेवणासाठी खर्च होतात. परंतु सरत्या शेवटी कमावलेला सगळा पैसा खर्च होत असल्याने काही वेळातर नीट जेवणासाठीही पैसा उतर नाही.

- Advertisement -

असे असतानाही १२ वीला त्यांच्या नातीने ८० टक्के गुण मिळवले त्यावेळी आनंदात त्यांनी पूर्ण दिवस प्रवाशांची फ्रीमध्ये सेवा केलीय. पुढे देसराज सांगतात, १२ वी नंतर नातीला दिल्लीतील कॉलेजमधून बीएड करायचे होते. परंतु बीएड कॉलेजची फी परवडत नसताही त्यांनी तिला राहते घर विकूण अॅडमिशन करुन दिले. यावेळी देसराज यांचे पूर्ण कुटुंब गावातील एका नातेवाईकाच्या घरी राहण्यासाठी गेले तर देसराज यांनी अधिक मेहनत घेत पैसा कमावण्यासाठी मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतरही त्यांचे आयुष्य सुखकर नव्हते घरच्या जबाबदाऱ्यांची जाणीव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती, कोणाकडे भाड्याने राहव तर पैसा जाणार म्हणून देसराज दिवस रात्र रिक्षा लोकांना आपल्या इच्छीत स्थळी पोहचवतात. त्यानंतर रिक्षात आपले घर बनवत असे.

देसराज यांच्या संघर्षाची कहाणी सध्या सोशल मि़डियावर व्हायरल होत असून अनेकांना वाचून डोळ्यात पाणी येत आहे. ही कहाणी वाचून अनेकांनी देसराज यांनी मदतीचे आवाहन केले आहे तर मदत करण्यासाठीही पुढे सरसावले आहेत. एका फेसबुक युर्जसने देसराज यांच्यासाठी फंड रेजिंग स्टार्ट केले आहे. दरम्यान आत्तापर्यंत २७६ लोकांनी ५ लाख रुपेय मदत म्हणून जमा केले आहेत. तर एका काँग्रेस नेत्यानेही ट्विटरच्या माध्यमातून देसराज यांची पोस्ट शेअर करत मुंबईकरांना देसराज यांनी मदतीचे आवाहन केले आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -