सोप्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि जिंका आकर्षक बक्षिसं!

my mahanagar contest

गेलं वर्षभर तुम्हाला आसपासच्या प्रत्येक घडामोडीविषयी थेट तुमच्या मोबाईलवर बातमी देणाऱ्या आपल्या मराठी वेब पोर्टल mymahanagar.com ला येत्या १९ जून रोजी एक वर्ष पूर्ण होतंय! बातमी..मग ती राजकीय असो, सामाजिक असो, मनोरंजन विश्वातली असो किंवा मग क्रीडा विश्वातली, त्या प्रत्येक बातमीचा पाठपुरावा करून तुमच्यापर्यंत सत्य पोहोचवण्यात mymahanagar.com नं नेहमीच प्रामाणिक आणि सार्थ प्रयत्न केले आहेत. ब्रेकिंग न्यूजच्या मागे न धावता खरी परिस्थिती आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवली आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भिड पत्रकारितेचा आदर्श नमुनाच या वर्षभरात आपल्या वाचक परिवारासमोर ठेवला आहे. त्याच mymahanagar.com चा पहिला वर्धापन दिन १९ जूनला लाखो फॉलोअर्स, वाचक मित्र आणि सहकाऱ्यांच्या साक्षीनं साजरा होत आहे. गेल्या वर्षभरात वाचकांनी दिलेल्या प्रेमाची एक छोटीशी परतफेड म्हणून आपण वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक स्पर्धा आयोजित केली आहे. यासाठी तुम्हाला फक्त एक टॅगलाईन तुमच्या आवडीचे शब्द टाकून पूर्ण करायची आहे.

काय आहे टॅगलाईन?

‘माय महानगर’ म्हणजे ………..!

या वाक्यातल्या पुढच्या मोकळ्या जागेत तुमच्या आवडीचे शब्द टाकून तुम्हाला ही टॅगलाईन पूर्ण करायची आहे. माय महानगरच्या परीक्षण समितीला आवडणाऱ्या पहिल्या ३ टॅगलाईनसाठी आकर्षक बक्षिसं देण्यात येणार आहेत. माय महानगरच्या परिवारासोबत आपले सगळ्यांचेच ऋणानुबंध अधिक घट्ट व्हावेत, यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न समजा हवं तर!

उत्तराच्या मेलमध्ये कोणती माहिती असावी?

१. पूर्ण केलेली टॅगलाईन (तुमचं उत्तर)
२. तुमचं नाव
३. तुमचा मोबाईल क्रमांक (विजेत्या स्पर्धकांशी पुढील समन्वयासाठी)

काय आहेत अटी आणि शर्ती?

१. परीक्षकांचा निर्णय स्पर्धकांवर बंधनकारक राहील
२. एकावेळी एकाच व्यक्तीला स्पर्धेत भाग घेता येईल
३. विजेत्यांनी नावं जाहीर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत ‘माय महानगर’च्या कार्यालयात येऊन आपली बक्षिसे घेऊन जावीत
४. विजेत्यांनी येताना स्वतःचे आधारकार्ड किंवा सक्षम ओळखपत्र घेऊन यावे
५. मुंबई न्यायकक्षेच्या अधीन
६. वियजी स्पर्धकांव्यतिरिक्त सर्व सहभागी व्यक्तींची नावे आणि त्यांच्या टॅगलाईन वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येतील
७. टॅगलाईन पाठवण्याची शेवटची तारीख १९ जून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असेल

‘माय महानगर’च्या प्रायव्हसी पॉलिसीसाठी इथे क्लिक करा