घरट्रेंडिंगअखेर चंद्रावर पाणी सापडलं; पण पृथ्वीच्या नाही!

अखेर चंद्रावर पाणी सापडलं; पण पृथ्वीच्या नाही!

Subscribe

सूर्यमालेतला पाचवा ग्रह असलेल्या ज्युपिटरच्या ७९ चंद्रांपैकी एक असलेल्या युरोपावर नासाला पाणी सापडलं असून आता जीवसृष्टीविषयक संशोधनाला गती मिळण्याची शक्यता आहे.

आपल्या संपूर्ण सूर्यमालेमध्ये असलेल्या सर्व ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवरच जीवसृष्टीचे अवशेष असल्याचं जगजाहीर आहे. कारण पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे जिथे सजीवसृष्टी अस्तित्वात राहण्यासाठी आवश्यक असलेलं हवामान आणि घटक आहेत. मात्र, आता पृथ्वीव्यतिरिक्त देखील चंद्रावर सजीव सृष्टीसाठी आवश्यक असलेला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाण्याचं अस्तित्व सापडलं आहे. नासाने आपल्या संकेतस्थळावर यासंदर्भात माहिती दिली आहे. आपल्या सूर्यमालेतला पाचवा ग्रह असलेल्या ज्युपिटरच्या ७९ उपग्रहांपैकी एक असलेल्या युरोपा या उपग्रहावर अर्थात ज्युपिटरच्या चंद्रावर नासाच्या संशोधन यानाला बाष्प सापडलं आहे. त्यामुळे अर्थात बाष्प म्हणजे पाणी आणि पाणी म्हणजे सजीव सृष्टी अस्तित्वात असण्याची किंवा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

पहिल्यांदाच सापडलं पाणी

सूर्यापासून जसजसे लांब जातो, तसतसं या ग्रहांवरचं तापमान कमी होत जातं. सूर्याच्या सगळ्याच जवळचा असलेल्या मर्क्युरीवर प्रचंड तापमान असतं. त्यामुळे सूर्यमालेत पाचव्या स्थानी असलेल्या ज्युपीटरवर पूर्णपणे बर्फ असून ते खडकाळ जमिनीप्रमाणे कठीण आणि टणक आहे. त्याच्याच ७९ चंद्रांपैकी एक असलेल्या युरोपावरही तशीच परिस्थिती आहे. पण त्यातही नासाच्या यानाने घेतलेल्या छायाचित्रांमध्ये बाष्प नजरेस पडल्यामुळे ही संशोधनाच्या दृष्टीने एक मोठी उपलब्धी असल्याचं मानलं जात आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे युरोपावर बाष्प आढळून आलं आहे.

- Advertisement -

जीवसृष्टीविषयी संशोधनाचा मार्ग खुला!

ज्युपिटरचा युरोपा हा उपग्रह आकारात पृथ्वीपेक्षाही दुप्पट असू शकतो. त्यामुळे युरोपावरच्या बर्फाची जाडी ही कित्येक किलोमीटर असू शकते. मात्र, तरीदेखील नासाच्या निष्कर्षातून या बर्फाला तडा गेल्याचं दिसून येत आहे. त्यातून प्रत्येक मिनिटाला किमान २ हजार ३६० किलो इतक्या वजनाचं पाणी बाहेर येत असून ते सलग येत नसून अनियमितपणे बाहेर येत असल्याचं नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. जीवसृष्टीसाठी आवश्यक असलेले कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर हे घटक सूर्यमालेतल्या इतर ग्रह किंवा उपग्रहांवर सापडले होते. मात्र, पाणी पहिल्यांदाच सापडल्यामुळे आता नासाच्या शास्त्रज्ञांना युरोपावरील जीवसृष्टीच्या शक्यतेविषयी अधिक संशोधन करणं शक्य होणार आहे.

पाहा कसं सापडलं नासाला पाणी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -