नाशिकमधील पीओपी मूर्तिकारांना नोटिसा, महापालिकेचा कारवाईचा इशारा

गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2022) आता अवघे २ महिने शिल्ल्क राहिले असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्येही (Sarvajanik Ganeshotsav Mandal) लगबग सुरू झाली आहे. तसेच, सर्व मुर्तीकारांनी (Ganesh Idol) तयारीला सुरूवात केली आहे.

ganeshotsav guidelines 2021 many states including maharashtra delhi and up have imposed restrictions

गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2022) आता अवघे २ महिने शिल्ल्क राहिले असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्येही (Sarvajanik Ganeshotsav Mandal) लगबग सुरू झाली आहे. तसेच, सर्व मुर्तीकारांनी (Ganesh Idol) तयारीला सुरूवात केली आहे. परंतु, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची (POP) मूर्ती बनवणाऱ्या मूर्तीकारांना बंधनांनचा सामना करावा लागत आहे.

याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने (NMC) काही दिवसांपूर्वी पीओपीच्या मूर्तींवर बंदी घातली होती. त्यानंतर आता या मुर्तीकारांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार, शहरातील मूर्तिकारांना या मूर्ती योग्य प्रकारे मार्गी लावण्याबाबत नोटिसाही दिल्या आहेत. (Nashik Municipality Issued Notices To Sculptors In The City To Properly Arrange Plaster Of Paris Idol)

आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कारवाई

नाशिक महापालिकेच्या नोटीसनुसार, ८ दिवसांत या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, महापालिकेच्या या नोटीसवर (NMC Notice) पर्याय देण्यासाठी मूर्तिकार संघटनेने महापालिका आयुक्तांकडे धाव घेतली आहे.

यंदा पीओपी मूर्तींसाठी परवानगी

नाशिक (Nashik) शहरात चार लाखांपेक्षा अधिक पीओपी मूर्ती तयार असल्यामुळे यंदा पीओपी मूर्तींसाठी (POP Idol) परवानगी देण्याची मागणी जिल्हा मूर्तिकार संघटनेमार्फत करण्यात येत होती.

घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत नोटीस

परंतु, २३ जूनला शहरातील १५ ते २० गणेशमूर्ती कारखान्यांना महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत नोटीस देण्यात आली आहे. पीओपी मूर्तींची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचा आदेश देण्यात आला असून, असे न केल्यास या मूर्तिकारांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत शुक्रवारी महापालिका आयुक्त रमेश पवार यांच्याकडे निवेदन देण्यात आले. मूर्तिकारांचे नुकसान टाळण्यासाठी यंदा पीओपी मूर्ती वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्याद्वारे करण्यात आली आहे.


हेही वाचा – सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी जितेंद्र आव्हाडांचे कौतुकोद्गार