Navratri 2021 Kalash Sthapana: नवरात्रौत्सवासाठी घटस्थापना कशी कराल? जाणून घ्या मुहूर्त, विधी आणि साहित्य

यंदाचा नवरात्रोत्सव आठ दिवसांचा आला आहे.त्यामुळे या नवरात्रौत्सवाला विशेष महत्त्व आहे. 

Navratri 2021 Kalash Sthapana puja path samgri muhurt Rituals and Literature
Navratri 2021 Kalash Sthapana: नवरात्रौत्सवासाठी घटस्थापना कशी कराल? जाणून घ्या मुहूर्त, विधी आणि साहित्य

शारदीय नवरात्र (Shardiya Navratri 2021 ) उत्सवाचा प्रारंभ अश्विन शुल्क प्रतिपदेपासून होत आहे. येत्या ७ ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना करुन नवरात्रीचे व्रत करुन दुर्गा मातेची पूजा केली जाते. घटस्थापनेलाच कलश स्थापना असे देखील म्हटले जाते. पंचांगानुसार, अश्विन शुक्ल प्रतिपदेच्या तिथीला म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजून ३५ मिनिटांनी सुरू होईल आणि प्रतिपदा तिथी ७ ऑक्टोबरला दुपारी १वाजून ४७ मिनिटांपर्यंत राहिल. शास्रानुसार ज्या तारखेला सुर्योदय होतो त्या तारखेला शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. घटस्थापना करुन देवी शैलपुत्रीच्या पहिल्या स्वरुपाची पूजा केली जाते. यंदाचा नवरात्रोत्सव आठ दिवसांचा आला आहे.त्यामुळे या नवरात्रौत्सवाला विशेष महत्त्व आहे.

घटस्थापनेचा सर्वोत्तम मुहूर्त

सकाळी ६:५४ ते सकाळी ९:१४ वाजेपर्यंत

सकाळी ११:३७ ते दुपारी १२:२३ वाजेपर्यंत

घटस्थापनेसाठी साहित्य

नवरात्री घटस्थापनेसाठी लाल रंगाचे कापड लागते. त्याचप्रमाणे मातीचे लहान मडके, विविध प्रकरची धान्ये, लहान टोपली,माती,कापूर,रांगोळी, वेलची,लवंग, सुपारी, अक्षतांसाठी तांदुळ, आंब्यांची डहाळी (आंब्याची पाने), पैशांची नाणी, लाल ओढणी किंवा चुनरी, पान, सुपारी,शेंदूर,नारळ,फळे,फुले,श्रृंगार पेटी, फुलांचे हार.

घटस्थापनेची विधी

सकाळी स्नान करुन पाटावर  लाल कापड मांडून त्यावर रांगोळी काढा. त्यानंतर त्यावर टोपली ठेवून त्यात माती भरा. मातीत विविध प्रकारची धान्य पेरुन त्यावर थोडे पाणी शिंपडा. त्यानंतर मातीच्या लहान मडक्यात पाणी भरुन त्यात अक्षता, फुले,पान सुपारी,नाणी टाका. त्यानंतर त्यात आंब्याची पाच पाने ठेवा. आंब्यांच्या पानाच्या मधोमध नारळ ठेवा. नाराळाला हळद कुंकू वाहून, फुले वाहून नारळाच्या डोक्यावर फुले किंवा काही जणांमध्ये वेळी घालण्याची प्रथा आहे. अशाप्रकारे देवीची घटस्थापना करावी.

घटस्थापना करताना म्हणा ‘हे’ मंत्र

१ सर्वस्वरुपे,सर्वेशे सर्व शक्ती समन्विते|
भसेत्भयस्त्राहि नो देवि दुर्गे देवी नमोस्तुते ||

२. लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्र्ध्दे पुष्टिस्वधे ध्रुवे|
महारात्रि महालक्ष्मी नारायणी नमोस्तुते||
ओम वागिश्वरी महागौरी गणेश जननी शिवे|
विद्यां वाणिज्य बुद्धीं देही मे परमेश्वरी ||


हेही वाचा – Shardiya Navratri 2021: मुंबईत नवरात्रौत्सवासाठी देवींच्या मूर्तींच्या कामाला वेग