घरट्रेंडिंगनवरात्रीचा नवा ट्रेंड; तरुणींमध्ये धोतीसह फेट्याची क्रेझ

नवरात्रीचा नवा ट्रेंड; तरुणींमध्ये धोतीसह फेट्याची क्रेझ

Subscribe

मानसी देशमूख । नाशिक

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसातच दांडिया आणि गरबा कार्यक्रमांना फुल्ल गर्दी दिसत आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी दांडियाप्रेमींना मनसोक्तपणे दांडिया खेळण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे यंदा प्रत्येक दांडियाप्रेमीने हटके तयारी केली आहे. यंदाचा ट्रेंड म्हणजे चक्क तरुणी घागर्‍याला सुट्टी देत नक्षीदार धोती आणि राजस्थानी फेट्याला पसंती दर्शवत आहेत.

- Advertisement -

नवरात्रोत्सवात गरबा-दांडिया खेळायची एक वेगळीच क्रेझ तरुणाईमध्ये असते. पण यावेळी नेमका लूक कसा करावा, केडिया-लेहेंगा भाड्याने घ्यावा का, या संभ्रमात तरुण-तरुणी असतात. बहुतांश गरबा- दांडियाप्रेमी भाडेतत्वावर आपला पेहराव घेताना दिसतात. तर काही शौकींनांनी किंमतीची विचार न करता केडिया- लेहेंगा घेतला आहे. पेहरावात नेहमीप्रमाणे यंदाही इंडो वेस्टर्नचा ट्रेंड टिकून आहे. त्याचप्रमाणे पारंपारिक राजस्थानी पेहरावालाही मागणी आहे. ड्रेसची किंमत किंवा भाडे त्यावरील केलेल्या एम्ब्रॉयडरीवर अवलंबून असते. भाडेतत्वावरील पेहराव साधारणत: ६०० रुपयांपासून उपलब्ध आहे. तर पुरुषांसाठी शेरवानी, काठेवाडी, धोती, पटियाला आदींचा ट्रेंड आहे. भरजरी वर्क असलेल्या पेहरावांची भाडे एक हजार रुपयांपर्यंत आहे.

असा आहे ट्रेंड

फूल लेंथ घागर्‍याची मागणी यंदाही टिकून आहे. ‘कली लेहंगा’ला तरुणींची सर्वाधिक पसंती आहे. यात कळ्यांप्रमाणे प्लेटस जोडण्यात आल्या आहेत. सर्वच तरुणाईत गडद रंगांची मागणी आहे. यात जांभळा, निळा, हिरवा, लाल, मरुन, पांढरा, केशरी आणि कोक रंगाचे पेहराव भाव खात आहेत. महत्वाचे म्हणजे यंदा बाजारपेठेत युनिसेक्स धोतीचे क्रेझ मोठ्या प्रमाणावर आहे. रेडिमेट आणि फॅन्सी धोतीला यंदा कमालीची मागणी आहे. तरुणी घागर्‍याऐवजी अशा प्रकारच्या धोती खरेदी करण्यास वा भाडेतत्वावर घेण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे यंदा धोतीवाले गरबा- दांडियाप्रेमींची मांदियाळी दिसत आहे. त्याचबरोबर आकर्षक नक्षीकाम केलेले जॅकेट्स, गुजराती कलेने तयार केलेले केडिया पेहराव, घागरा आणि चनिया चोलीवर मॅचिंग ऑक्साईडची ज्वेलरीचा ट्रेंड यंदाही दिसून येत आहे. शिवाय पुरुषांप्रमाणे तरुणीही आता राजस्थानी बनावटीच्या फेट्याला पसंती देत आहेत.

- Advertisement -

 

 

कपल ड्रेसची चलती

एकच पेहराव भाडेतत्वावर घ्यायचा असेल तर तो कुठेही मिळतो. परंतु काही दुकानांमध्ये कपल्ससाठी ड्रेसेस उपलब्ध आहे. एकमेकांना मॅच होतील अशा पेहरावांमुळे हे कपल खर्‍या अर्थाने एकमेकांशी समरुप होताना दिसत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -