घरट्रेंडिंगइंटरनेटवर मराठीचाच बोलबाला, हिंदीलाही टाकले मागे!

इंटरनेटवर मराठीचाच बोलबाला, हिंदीलाही टाकले मागे!

Subscribe

भारतात मराठीपेक्षा हिंदी आणि बंगाली भाषिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे देशामध्ये या भाषांचे नेहमीच वर्चस्व पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला इंटरनेटवर इंग्रजी भाषेचे वर्चस्व आहे. तरीदेखील इंटरनेटवर वापरल्या आणि लिहिल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीने हिंदी आणि बंगालीसारख्या अग्रणी भाषांना धोबीपछाड दिली आहे.

२०११च्या जनगणनेनुसार देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये केलेल्या पाहणीत मराठी ही देशातली तिसऱ्या क्रमांकाची भाषा ठरली होती. नुकतीच ही आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यावरून मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचं स्पष्ट होत आहे. आता मराठी भाषेच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. देशात इंटरनेटवर वापरल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषा पहिल्या क्रमांकावर असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. मराठी भाषिक लोक इंटरनेटवर मराठी भाषेचा वापर करत असल्याचे या सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे. एकीकडे मातृभाषेत बोलणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याची चिंता भेडसावत आहे. त्यातच इंग्रजी भाषेचा वापर वाढला आहे. असे असताना इंटरनेटवर वाढलेला मराठीचा टक्का मराठी भाषिकांसाठी सुखावणारी बाब आहे.

Chart
सरासरी भाषिक युजर्स

मराठीसह बंगाली आणि तेलुगूचेही वर्चस्व

भारतात हिंदी ही सर्वाधिक प्रमाणात बोलली आणि लिहिली जाणारी भाषा आहे. परंतु, इंटरनेट वापरात मराठी, बंगाली आणि तेलुगू भाषिकांचा दबदबा असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. रेवरी लँग्वेज टेक्नॉलॉजीने याबाबतचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये मराठी युजर्स इंटरनेटवर सर्वाधिक अॅक्टिव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

८९ हजार लोकांचा अभ्यास

या सर्वेक्षणासाठी ८९ हजार युजर्सचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये प्रत्येक युजरकडून प्रमाण भाषेत सरासरी किती शब्द टाईप केले जातात हे तपासण्यात आले. त्यानुसार मराठी आणि बंगाली नागरिकांकडून डिजिटल प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर होत असल्याचे दिसून आले आहे. हे लोक मराठी आणि बंगाली भाषेचा अधिक वापर करत असल्याचे पहायला मिळाले, अशी माहिती रेवरी लँग्वेज टेक्नॉलॉजीचे मार्केटिंग हेड ऋशी कुडाळे यांनी लाईव्ह क्विंटशी बोलताना दिली.

अल्पसंख्यांक भाषांचाही वापर

देशातल्या प्रमुख भाषांसह देशात अल्पसंख्याकांच्या भाषांचादेखील वापर होत असल्याचे दिसून आले. त्यामध्ये प्रामुख्याने बोडो, डोंगरी, मैथिली, सिंधी आणि संताली या भाषांचा इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. या भाषा बोलणाऱ्यांची संख्या कमी आहे. परंतु तरीही या भाषांचा इंटरनेटवर वापर होत असल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

९९ टक्के भारतीय इंटरनेट वापरतात

९९ टक्के भारतीय युजर्स आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन वापरतात, असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे. भारतात जवळपास ५४ टक्के युजर्स ५ ते ११ हजार रुपयांच्या किंमतीचे मोबाईल वापरतात. गुगलने काही महिन्यांपूर्वी एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये सांगण्यात आले होते की, भारतात ५० कोटींहून अधिक लोक इंटरनेट वापरतात. त्यापैकी ७३ टक्के युजर्स त्यांच्या मातृभाषेतून किंवा स्थानिक भाषेतून ऑनलाईन डेटा सर्च करतात.

देशात ४३ टक्के लोक हिंदी भाषिक

देशामध्ये ४३.६३ टक्के लोक हिंदी भाषिक आहेत. गेल्या दहा वर्षांत हिंदी भाषा बोलणाऱ्यांच्या संख्येत सरासरी ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्वाधिक प्रमाणात मातृभाषेत बोलणाऱ्यांपैकी हिंदी भाषा पहिल्या स्थानावर आहे. तर दुसरा क्रमांक बंगाली भाषिकांचा लागतो. मराठी भाषा चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -