Eco friendly bappa Competition
घर टेक-वेक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कोणालाही दिसणार नाही तुमचा नंबर, जाणून घ्या नव्या फिचरबद्दल!

व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कोणालाही दिसणार नाही तुमचा नंबर, जाणून घ्या नव्या फिचरबद्दल!

Subscribe

अॅन्ड्रॉइड बिटा २.२२.१७.२३ या अपडेटवर हे फिचर उपलब्ध होणार आहे. मात्र, अॅप्पलच्या ग्राहकांना तुर्तास ही सेवा घेता येणार नाहीय.

जगभरात संदेश वहनासाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सअॅपमध्ये (Whats App) रोज नवनवे फिचर्स येत असतात. आपल्या ग्राहकांना व्हॉट्सअॅप सोयीचे व्हावे याकरता नियमित बदल केले जातात. त्यातच आता आणखी एक नवा बदल लवकरच येणार आहे. याद्वारे तुम्ही एखाद्या अनोळखी ग्रुपमध्ये अॅड (Whats App Group) असाल तरी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक ग्रुपमधील इतरांपासून लपवता येणार आहे. हे फिचर अद्याप लॉन्च झाले नसून त्यावर काम सुरू आहे, अशी माहिती समोर आली आहे. (New feature about hiding number in what’s app group)

हेही वाचा – अरे वाह! तुम्हीच ठरवा तुमचा डीपी कोण पाहणार, व्हॉट्सअॅपचा नवा फिचर लॉन्च

- Advertisement -

आपण अनेकदा विविध ग्रुप्समध्ये समाविष्ट असतो. या ग्रुपमध्ये आपल्याला अनोळखी असलेले अनेकजण समाविष्ट असतात. त्यामुळे त्यांच्याकडून आपल्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर केला जातो. अशावेळी ग्रुपमधील अनोळखी लोकांपासून आपला मोबाईल क्रमांक लपवण्यासाठी व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच फिचर येणार आहे. सध्या या फिचरवर काम सुरू आहे.

अॅन्ड्रॉइड बिटा २.२२.१७.२३ या अपडेटवर हे फिचर उपलब्ध होणार आहे. मात्र, अॅप्पलच्या ग्राहकांना तुर्तास ही सेवा घेता येणार नाहीय.

- Advertisement -

हेही वाचा – युजर्ससाठी व्हॉट्सअॅपचे नवे फीचर; ‘डिसएपियरिंग’मध्ये मोठा बदल

‘डिसएपियरिंग’मध्ये मोठा बदल

पूर्वी वापरकर्त्यांना त्यांचे संदेश हटवण्यासाठी २४ तास, ७ दिवस आणि ९० दिवस होते. मात्र या फीचरनंतर मेसेज कधीही डिलीट होणार नाही. व्हॉट्सअॅप ट्रॅकर WABetaInfo च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप सध्या एका Disappearing Kept Messages फीचरवर काम करत आहे. ज्यानंतर मेसेज डिलीट झाल्यानंतरही दिसणार आहेत. व्हॉट्सअॅप हे डिलिट होणारे केप्ट मेसेजेस वैशिष्ट्य Android, iOS आणि WhatsApp डेस्कटॉपसाठी देखील जारी करेल.

या फीचरनंतर यूजर्स डिलीट केल्यानंतरही एका विशिष्ट मोडमध्ये मेसेज पाहता येणार आहेत. व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरला Kept Messages असे नाव देण्यात आले आहे. सर्व वापरकर्ते त्यांच्या संभाषणांमध्ये केप्ट मेसेजेस वापरण्यास सक्षम असणार आहेत. हे फिचर सध्या डेव्हलपमेंट मोडमध्ये असले तरी त्यात आणखी बदल पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा – Digilocker on WhatsApp: आता व्हॉट्सअॅपवर पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करता येणार

तुम्हीच ठरवा तुमचा डीपी कोण पाहणार

ऑनलाईन पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतर व्हॉट्सअॅपने नवा फिचर आणला आहे. यामुळे तुमचा डीपी कोण बघणार हे तुम्हीच ठरवू शकणार आहात. त्यामुळे या फिचर्सची सध्या खूप जास्त चर्चा रंगली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -