घरटेक-वेकWhatsApp...डिलीट केलेले मेसेज वाचायचे आहेत? तर मग हे करा...

WhatsApp…डिलीट केलेले मेसेज वाचायचे आहेत? तर मग हे करा…

Subscribe

व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी नेहमी काहीना काही फिचर आणत असते. प्रत्येकवेळी व्हॉट्सअॅपने आणलेले फीचर मजेदार असते. २०० कोटीहून अधिक युजर्स व्हॉट्सअॅप वापरतात. हे जगातील नंबर वनचे मेसेजिंग अॅप आहे. गेल्या काही वर्षांपासून व्हॉट्सअॅपमध्ये अनेक अपडेट आणि फीचर मिळाले आहेत. यातील एक म्हणजे डिलीट झालेले मेसेज एक आहे.

मेसेज डिलीट करणे

मेसेज डिलीट करणे या फीचरला कंपनीला २०१७ ला लाँच केलं. युजरने चुकून पाठवलेले मेसेज डिलीट करू शकतो. डिलीट झालेले मेसेज ग्रुप किंवा पर्सनल चॅटवरून गायब होतात. डिलीट झालेले मेसेज कोणी पाहू शकत नाही. हे मेसेज पुढच्या ७ मिनीटाच्या आत डिलीट करावे लागतात तरच ते ग्रुपवरून डिलीट होतात.

- Advertisement -

डिलीट केलेल मेसेज परत वाचा

आता तुम्हाला डिलीट केलेले मेसेज परत वाचता येणार आहेत. यात एक खास ट्रिक आहे. ज्यामुळे डिलीट झालेले मेसेज वाचता येऊ शकतात. व्हॉट्सअॅप चॅट मधून डिलीट झालेले मेसेज वाचण्यासाठी तुमच्याकडे अँड्रॉयड स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. जर अँड्रॉयड स्मार्टफोन युजर आहात तर डिलीट झालेले मेसेज वाचू शकता.

यासाठी या स्टेप्स फॉलो करा

- Advertisement -

१. गुगल प्ले स्टोरमधून WhatsRemoved+ अॅप डाउनलोड करा.

२. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर अॅपला सर्व अॅक्सेस द्या.

३. या ठिकाणी त्या अॅपसंबंधी विचारले जाईल. ज्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सेव्ह करायचे आहे किंवा अॅपमध्ये बदल करायचा आहे.

४. अॅप्सच्या यादीत व्हॉट्सअॅपची निवड करा.

५. पुढील स्क्रीनवर Allow टॅप करा आणि Yes, Save Files ला सिलेक्ट करा. असे केल्यानंतर अॅपची सेटिंग पूर्ण होईल.

६. यानंतर व्हॉट्सअॅपवर सर्व नोटिफिकेशनसोबत डिलीट झालेले मेसेज या ठिकाणी सेव्ह केलेले मिळतील.

७. डिलीट मेसेज पाहण्यासाठी तुम्हाला केवळ या अॅपला ओपन करून टॉप बारमध्ये व्हॉट्सअॅप सिलेक्ट करणे आवश्यक आहे.


हे ही वाचा – कोरोनाबाधित मटण विक्रेत्याच्या संपर्कात आले ३०० ग्राहक आणि…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -