Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग ऐकावं ते नवल! ४० घरांमध्ये नळातून येऊ लागली देशी दारू, बघा कुठे...

ऐकावं ते नवल! ४० घरांमध्ये नळातून येऊ लागली देशी दारू, बघा कुठे घडला प्रकार

Related Story

- Advertisement -

घरातील पाण्याच्या नळातून गढूळ पाणी किंवा वेगळ्या रंगाचे केमिकल मिश्रित पाणी आल्याचा प्रकार आपण अनेकदा ऐकून आहोत. मात्र गुजरातमधील तब्बल ४० घरांमध्ये नळातून चक्क देशी दारु आल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झालेय. गुजरातच्या अहमदाबादमधील सारखेज गावात ४० घरांमध्ये पाण्याच्या नळातून दारू येत असल्याचा दावा स्थानिकांनी केला. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत पाण्याचे नमुने फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवले आहेत. या चाचणी अहवालातून मात्र काही तरी वेगळचं सत्य समोर आले.

पाण्याच्या चाचणी अहवालातील सत्य काही तरी भलतचं 

घरातील नळांमधून देशी दारु येत असल्याचा दावा स्थानिकांनी केला. स्थानिकांच्या या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास सुरु झाला. यावेळी नळातून येणाऱ्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. या अहवालाचे नमुने हाती आले. मात्र त्यात दारुचा कोणताही उल्लेख नाही. असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच त्या पाण्यामध्ये मलपदार्थ आणि ई कोली नावाचा बॅक्टेरिया मोठ्याप्रमाणात आढळून आले. हा बॅक्टेरिया आतड्यांमध्ये असतो. असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

गटारातील अस्वच्छ पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये शिरलं 

- Advertisement -

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला मात्र हा विषय महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असल्याने तक्रार दाखल करण्यात आली नाही. मात्र नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारी ही कृती असल्याने अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल पोलिसांना करण्यात येत आहे. त्यावर पोलिसांनी ही कृती जाणूनबुजून करण्यात आलेली नाही. त्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या कृतीबाबत गुन्हा दाखल कण्यात आलेला नाही असे सांगितले. महापालिकेचे कर्मचारी गटार साफ करत असताना त्यातील अस्वच्छ पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये शिरलं अशी माहिती पोलिसांनी दिली.

गेल्या महिन्याभरापासून पिण्य़ाच्या पाण्याच्या नळातून देशी दारु येत असल्याची तक्रार सारखेजमधील ४० घरांमधील नागरिकांनी केल्या होत्या. याप्रकारानंतर स्थानिकांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तपास करण्य़ास सुरु केला. दरम्यान या परिसरात काही घरांमध्ये देशी दारु तयार करण्याचे अवैध्य धंदे चालतात. अनेकदा येथील लोक नको असलेली देशी दारु पाण्यात सोडतात. ती पिण्याच्या पाण्य़ाच्या पाईपलाईनमध्ये शिरत असल्याचा दावा स्थानिकांनी केला.


Konkan Rain Update : कोकणात मुसळधार पावसाचे थैमान; गुहागरमध्ये पुरस्थिती, अनेक गावांना सतर्कतेचा इशारा


- Advertisement -

 

- Advertisement -